Homeताज्या बातम्या

आरोपींसोबत जंगी वाढदिवस आणि फटाक्यांची आतषबाजी; अर्धापूरच्या एपीआयच्या पार्टीमुळे नांदेड पोलीस दलाची प्रतिष्ठा चव्हाट्यावर!

नांदेड : नांदेड जिल्हा पोलीस दलाची निष्पक्ष आणि तटस्थ प्रतिमा मलिन करणारा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अर्धापूर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोली

सोनखेड पेट्रोल पंपावरील खूनप्रकरण उघड; 12 तासांत दोन्ही आरोपी जेरबंदरेल्वे स्थानकातून पलायनाच्या तयारीत असताना पोलिसांचा सापळा; तात्काळ कारवाईमुळे सामाजिक सलोखा अबाधित
नांदेड परिक्षेत्रात पोलिसांची धडक कारवाई; लातूर आणि नांदेड जिल्ह्यात धाडी टाकून १ कोटी ४२ लाखांचा मुद्देमाल जप्त
कसारपेठेत हातभट्टी दारू अड्ड्यावर पोलिसांची धडक कारवाई; २५ हजारांचे रसायन नष्ट, गावपातळीवरील जबाबदारांनाही कारवाईचा इशारा

नांदेड : नांदेड जिल्हा पोलीस दलाची निष्पक्ष आणि तटस्थ प्रतिमा मलिन करणारा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अर्धापूर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) विष्णू कराळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या जंगी पार्टीने पोलीस दलाची अब्रू चव्हाट्यावर आणली आहे. खून, ॲट्रॉसिटी, जुगार आणि विनयभंग यांसारख्या गंभीर गुन्ह्यांतील आरोपींच्या उपस्थितीत हा वाढदिवस साजरा झाल्याचा व्हिडीओ आणि छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

कायद्याचे रक्षक असलेल्या पोलीस अधिकार्‍यांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींशी अशा प्रकारचे थेट संबंध ठेवणे कितपत योग्य, असा प्रश्न आता नागरिक उपस्थित करू लागले आहेत. हॉटेलमधील जंगी पार्टी, फटाक्यांची आतषबाजी आणि स्थानिक आरोपींची हजेरी यामुळे खाकी वर्दीची प्रतिमा धुळीस मिळाली आहे. विशेष म्हणजे, या पार्टीचे आयोजन करणाऱ्या आणि त्यात उपस्थित राहणाऱ्या काही व्यक्तींवर अर्धापूर पोलीस ठाण्यातच गंभीर गुन्हे दाखल आहेत. अशा आरोपींकडून वाढदिवसाचे कोडकौतुक करून घेणाऱ्या अधिकार्‍यांच्या वर्तनामुळे संपूर्ण पोलीस यंत्रणेची विश्वासार्हता धोक्यात आली आहे.

नांदेड जिल्ह्यातील पोलीस दलात नैतिक संकेत पाळले जात नसल्याचे चित्र यापूर्वीही समोर आले होते, जेव्हा एका पोलीस निरीक्षकाने सार्वजनिक कार्यक्रमात राजकीय नेत्याची खुशामत करत थेट मुख्यमंत्रीपदासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. आता आरोपींसोबत रंगलेल्या या वाढदिवसाच्या पार्टीने त्या वादात आणखी भर घातली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ अधिकार्‍यांनी तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी सुजाण नागरिकांमधून केली जात आहे.

COMMENTS