बीड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या बीड शहर उपाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते तथा युवकांमध्ये लोकप्रिय असलेले रहेमत पठाण या

बीड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या बीड शहर उपाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते तथा युवकांमध्ये लोकप्रिय असलेले रहेमत पठाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे शहरातील अल्पसंख्याक समाज आणि कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
रहेमत पठाण हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक व जनहिताच्या प्रश्नांवर सातत्याने कार्यरत आहेत. समाजातील गरजू घटकांना मदत करणे आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी ते नेहमीच आघाडीवर असतात. त्यांच्या याच सक्रिय कार्याची दखल घेत पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर ही महत्त्वाची संघटनात्मक जबाबदारी सोपविली आहे.
या नियुक्तीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष निजाम शेख, बीड शहराध्यक्ष शेख शाकीर तसेच पक्षातील इतर प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रहेमत पठाण यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना रहेमत पठाण म्हणाले की, “पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, तो मी सार्थ ठरवेन. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अल्पसंख्याक समाजातील युवकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांच्या शिक्षण व रोजगाराच्या प्रश्नांवर काम करण्यासाठी मी कटिबद्ध आहे.” तसेच त्यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार आणि जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले. रहेमत पठाण यांच्या नियुक्तीमुळे बीड शहरात पक्षाची ताकद अधिक मजबूत होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

COMMENTS