Homeताज्या बातम्या

बीडमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; दुचाकी चोरटा जेरबंद, सहा मोटारसायकलींसह २.२० लाखांचा मुद्देमाल जप्त

बीड : बीड जिल्ह्यात वाढलेल्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या (L

’मकोका’मधील फरार आरोपीला पोलिसांनी सिनेस्टाईलने केली अटक
तौहिद खान हत्याकांडामुळे परळीत संताप; व्हायरल ऑडिओची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणीअल्पसंख्यांक संरक्षण संघर्ष समितीचे पोलीस अधीक्षक कार्यालयास निवेदन
दमिरर..!

बीड : बीड जिल्ह्यात वाढलेल्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत एका सराईत दुचाकी चोरट्याला अटक केली आहे. आरोपीकडून चोरीच्या ६ दुचाकी जप्त करण्यात आल्या असून, ३ मोठे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.

अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा (गुन्हा क्रमांक १३२/२०२६) समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू होता. यादरम्यान, संतोष बाबासाहेब मुंडे (रा. वरवटी, ता. अंबाजोगाई) याने बीडसह शेजारील जिल्ह्यांतून दुचाकी चोरून त्या आपल्या घराच्या पाठीमागे लपवून ठेवल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने १५ जून २०२६ रोजी वरवटी येथे छापा टाकून संशयित संतोष मुंडे याला ताब्यात घेतले.

पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून जप्त केलेल्या दुचाकींपैकी दोन अंबाजोगाई शहरातून, एक पुणे जिल्ह्यातून, एक लातूर जिल्ह्यातून आणि एक परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथून चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. या कारवाईत २ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपासासाठी आरोपीला अंबाजोगाई पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ही कारवाई प्रभारी पोलीस अधीक्षक चेतना तिडके, उपअधीक्षक ऋषिकेश शिंदे, एलसीबीचे शिवाजी बनटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सुशांत सुतळे व त्यांच्या पथकाने केली.

COMMENTS