Homeताज्या बातम्या

कोपरगाव तालुक्यात वादळाचा तडाखा; ब्राह्मणगाव येथे महिला शेतकऱ्याच्या सोलर पंपाचे अतोनात नुकसान

कोपरगाव शहर : कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे झालेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. येथील महिला शेतकरी विजया सो

वीज ग्राहकांच्या तक्रारी तत्काळ सोडवा, टाळाटाळ करणाऱ्यांना पाठीशी घालू नका; आमदार आशुतोष काळेंच्या महावितरणला कडक सूचना
शिर्डीतील शिवसेना मेळाव्यास कोपरगावच्या शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ८० टक्के समाजकारणावर भर
कोपरगाव तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीची तपासणी

कोपरगाव शहर : कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे झालेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. येथील महिला शेतकरी विजया सोपान बनकर यांच्या गट नंबर ५९१ मधील विहिरीवर बसवण्यात आलेल्या सौर कृषी पंपाचे आणि सोलर पॅनलचे या वादळात मोठे नुकसान झाले.

सोलर पॅनल उडून गेल्याने सदर शेतकरी महिलेचा वीज पंप पूर्णपणे बंद झाला असून, त्यांच्यासमोर सिंचनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या नुकसानीबाबत सोमनाथ हुळेकर, विशाल कुमावत, गणेश असणे, सचिन कांबळे आणि सोपान बनकर आदी ग्रामस्थांच्या समक्ष ब्राह्मणगाव ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने रीतसर पंचनामा करण्यात आला आहे. वादळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या या शेतकरी महिलेसह गावातील इतर सर्व बाधित शेतकऱ्यांना शासनाने तातडीने आर्थिक नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.

COMMENTS