चांदा : शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण स्वागत करत जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेशोत्सव सोहळा उत्स

चांदा : शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण स्वागत करत जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेशोत्सव सोहळा उत्साहात पार पडला. नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ, बिस्किटे आणि मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करून त्यांचे स्वागत करण्यात आले.
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी विद्यार्थी संघाचे सदस्य अमृत गांधी होते. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कैलास दहातोंडे, उपाध्यक्ष किरण जावळे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष डॉ. विनोद गुंदेचा, अण्णासाहेब दहातोंडे, बाळासाहेब दहातोंडे, बंडू दहातोंडे, देविदास पासलकर, बाबासाहेब जावळे, वसंत भगत, सचिन क्षीरसागर, विक्रम थोरात, प्राचार्य अंशुमन वाकचौरे, उपप्राचार्य रघुनाथ भोजने, पर्यवेक्षक राजेश शेंडगे, समन्वयक प्रा. भाऊसाहेब तांबे, प्रसिद्धी विभाग प्रमुख प्रा. रावसाहेब राशिनकर यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.
प्रवेशोत्सवानिमित्त इयत्ता पाचवीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक हरीश दगडखैर आणि क्रीडा शिक्षिका राक्षे यांचाही गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रुख्मिणी सोनवणे, अनंत शेळके, युवरा गायकवाड, स्वप्निल मालवंडे, स्वाती दळवी, जालिंदर शेटे, संदीप शेंडगे, घुगरकर, बबन घोडे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन संजय ढेरे यांनी केले.

COMMENTS