Homeताज्या बातम्या

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी घटनेनंतर महामार्गालगत विहिरींचा  प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर ! आतातरी प्राधिकरण आणि प्रशासनाला जाग येणार का?केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे तक्रार – डॉ. गणेश ढवळे

बीड जिल्ह्यातून जाणार्‍या विविध महामार्गांवर तब्बल 54 अपघात प्रवण (ब्लॅक स्पॉट) स्थळे असताना, रस्त्यालगत असलेल्या धोकादायक विहिरींचा प्रश्न गंभीर

चंदगड तालुक्यातील मागासवर्गीय समाजाच्या समस्या तात्काळ सोडवा-ब्लॅक पँथर
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रांजण ठेवले पण पाणीच नाही !पुष्पहार घालून, श्रीफळ फोडून गांधीगिरीतून प्रशासनाचा निषेध-डॉ.गणेश ढवळे
कोपरगावचे महिला समुपदेशन केंद्र बंद होण्याच्या मार्गावरडॉ. गावित्रे ; महिलांच्या समस्या सोडविणाऱ्या केंद्रास अद्याप पर्यायी जागा नाही



बीड जिल्ह्यातून जाणार्‍या विविध महामार्गांवर तब्बल 54 अपघात प्रवण (ब्लॅक स्पॉट) स्थळे असताना, रस्त्यालगत असलेल्या धोकादायक विहिरींचा प्रश्न गंभीर बनला आहे.  राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण,जिल्हा प्रशासन व वाहतूक विभागाच्या दुर्लक्षामुळे या विहिरी संभाव्य अपघातांचे मोठे कारण ठरत असल्याचे  सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी,राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण  आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी जवळ देवदर्शनाहुन परतणारे पिक अप रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत कोसळले यात 14 जणांपैकी 5 महिला व एका 6 महिन्याचा बाळासह 8 जणांचा मृत्यू झाला आहे तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत.  घटनेचा  दाखला देत यापुर्वीही नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे रस्त्यालगत असलेल्या विहिरीचा अंदाज न आल्याने कार थेट विहिरीत कोसळुन या भिषण अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला असून यात 7 लहान बालकांचा समावेश होता. या  दुर्दैवी घटनेनंतर सुद्धा प्रशासनाला जाग आलेली दिसत नाही.  अशीच दुर्दैवी घटना घडण्याची प्रशासन वाट पाहत आहे काय? असा संतप्त सवाल डॉ . गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी उपस्थित केला आहे.
बीड जिल्ह्यातील धोकादायक ठिकाणे
बीड जिल्ह्यातील अनेक ठिकाणी रस्त्याच्या अगदी कडेला विहिरी असून त्या अपघातास कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे. काही प्रमुख ठिकाणे पुढीलप्रमाणे: अहमदपूर-अहिल्यानगर महामार्गावर लिंबागणेशजवळ मुळुकवाडी शिवार, होळ परिसर, धुळे-सोलापूर महामार्गावर चौसाळा जवळ, बीड-शिरूर मार्गावर नागाची वाडी, अंबेजोगाई-लातूर मार्गावर बर्दापूर, कल्याण-विशाखापट्टणम मार्गावर मातोरी पुढे, मादळमोही परिसर, सिरसदेवी फाटा पुढे, शेगाव-पंढरपूर मार्गावर पात्रुड व तांबवा परिसर या सर्व ठिकाणी विहिरींना मजबूत सिमेंटचे संरक्षण कठडे नसल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे.
 लिंबागणेश जवळील मुळुकवाडी परिसरात गंभीर परिस्थिती
अहमदपूर-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्ग 548डी महामार्गावरील लिंबागणेशजवळील मुळुकवाडी शिवारात रस्ता आणि विहीर यामध्ये अंतरच नाही. येथे पूर्वी दोन अपघात झाल्यानंतर डॉ . गणेश ढवळे यांनी आंदोलनाचा इशारा  दिल्यानंतर  तात्पुरता पत्र्याचा कठडा उभारण्यात आला; मात्र, वेगवान वाहतुकीसमोर तो निष्प्रभ ठरत आहे. येथे मजबूत सिमेंट भिंत उभारण्याची मागणी करण्यात आली आहे.
यापूर्वीच्या अपघातांच्या घटना
नागाची वाडी फाटा (शिरूर कासार रोड): कार विहिरीच्या काठाला धडकून तरुणाचा मृत्यू, मुळुकवाडी (फेब्रुवारी): जीप कठडा तोडून विहिरीजवळ कोसळली (जिवितहानी टळली), होळ परिसर (ऑगस्ट 2025): कार विहिरीच्या कठड्याला धडकून एकाचा मृत्यू
मुख्य मागण्या
डॉ. गणेश ढवळे यांनी प्रशासनाकडे पुढील मागण्या केल्या आहेत: रस्त्यालगतच्या सर्व विहिरींचे तात्काळ सर्वेक्षण, मजबूत सिमेंट संरक्षण भिंती/कठडे उभारणे, धोकादायक ठिकाणी इशारा फलक व प्रकाश व्यवस्था, विहिरीच्या कडेला असलेल्या झाडाझुडपांमुळे विहीरीचा अंदाज येत नाही त्यामुळे आवश्यक उपाययोजना कराव्यात., अपघात प्रवण स्थळांवर तातडीने सुरक्षा उपाययोजना  अपघात होण्याची वाट न पाहता प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे.

COMMENTS