Homeताज्या बातम्या

मनोरंजन विश्व हादरले! ‘कुमकुम भाग्य’, ‘छावा’ फेम अभिनेत्री संचिता उगलेची आत्महत्या; अवघ्या ३० व्या वर्षी संपवलं आयुष्य!

https://www.youtube.com/watch?v=rBg7THyCWhY टेलिव्हिजन आणि चित्रपटसृष्टीतून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध

NEET पेपर लीक प्रकरणातील मुख्य आरोपी पी.व्ही. कुलकर्णीच्या अवैध मालमत्तेवर थेट हातोडा। लोकमंथनNews२४
अमृतसरमध्ये लष्करी तळांजवळ दोन भीषण स्फोट; फारुख अब्दुल्लां यांचे संतापजनक विधान
ऑपरेशन क्रॅकडाउनची धडक कारवाई : इस्लापूर परिसरात अवैध दारूवर मोठा प्रहार

टेलिव्हिजन आणि चित्रपटसृष्टीतून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री संचिता उगले हिने वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी आपले आयुष्य संपवले आहे. तिच्या या अचानक जाण्याने संपूर्ण मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री संचिता उगले मुंबईजवळील नालासोपारा येथील अचोले पोलीस स्टेशनच्या हद्दीत आपल्या आई-वडील आणि बहिणीसोबत राहत होती. रविवारी संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास, घरात कोणी नसताना तिने बेडरूममधील पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली.
संचिता उगले हिने अनेक लोकप्रिय टीव्ही मालिकांमध्ये काम करून आपली ओळख निर्माण केली होती. ‘कुमकुम भाग्य’, ‘वागले की दुनिया’ आणि ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ यांसारख्या प्रसिद्ध शोजमध्ये ती दिसली होती. एवढेच नाही तर, अभिनेता विक्की कौशलच्या आगामी ‘छावा’ चित्रपटातही तिने ‘ताराबाई’ ही महत्त्वाची भूमिका साकारली होती.

COMMENTS