Homeताज्या बातम्या

‘छावा’ फेम अभिनेत्री संचिता उगलेची आत्महत्या; अवघ्या ३० व्या वर्षी संपवलं आयुष्य!

मुंबई : टेलिव्हिजन आणि चित्रपटसृष्टीतून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री संचिता उगले हिने वय

नेवासा येथून अल्पवयीन पीडितेची सुटका; बीड एएचटीयू पथकाची धडाकेबाज कारवाई
शेवगाव पोलिसांचा मोठा दणका! सालवडगाव शिवारात अवैध ‘सुपारी मावा’ कारखान्यावर छापा
अमरावती हादरले! १८० तरुणींचे शोषण करून अश्लील व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या नराधमाला ठोकल्या बेड्या
कुमकुम भाग्य फेम अभिनेत्री संचिता उगलेने राहत्या घरी केली आत्महत्या, 19  तासांपूर्वी शेअर केलेला व्हिडीओ - Marathi News | Marathi actress Sanchita  Ugale life end at ...

मुंबई : टेलिव्हिजन आणि चित्रपटसृष्टीतून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री संचिता उगले हिने वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी आपले आयुष्य संपवले आहे. तिच्या या अचानक जाण्याने संपूर्ण मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री संचिता उगले मुंबईजवळील नालासोपारा येथील अचोले पोलीस स्टेशनच्या हद्दीत आपल्या आई-वडील आणि बहिणीसोबत राहत होती. रविवारी संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास, घरात कोणी नसताना तिने बेडरूममधील पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली.
संचिता उगले हिने अनेक लोकप्रिय टीव्ही मालिकांमध्ये काम करून आपली ओळख निर्माण केली होती. ‘कुमकुम भाग्य’, ‘वागले की दुनिया’ आणि ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ यांसारख्या प्रसिद्ध शोजमध्ये ती दिसली होती. एवढेच नाही तर, अभिनेता विक्की कौशलच्या आगामी ‘छावा’ चित्रपटातही तिने ‘ताराबाई’ ही महत्त्वाची भूमिका साकारली होती.
घटनास्थळी पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. मात्र, मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या काही महिन्यांपासून संचिताला हवं तसं काम मिळत नव्हतं, ज्यामुळे ती काही दिवसांपासून तीव्र नैराश्यात (Depression) होती. याच नैराश्यातून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.
सध्या अचोले पोलीस या प्रकरणी एडीआर (Accidental Death Report) अंतर्गत गुन्हा दाखल करून अधिक चौकशी करत आहेत. संचिताच्या जाण्याने पुन्हा एकदा सिनेसृष्टीतील कलाकारांच्या मानसिक आरोग्याचा आणि कामाच्या अनिश्चिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

COMMENTS