Homeताज्या बातम्या

श्रीगोंद्यात भूसंपादनाच्या मोबदल्यासाठी लाचेची मागणी; महसूल सहाय्यकासह कंत्राटी कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

अहिल्यानगर : राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या शेतजमिनीच्या भूसंपादन मोबदल्याची रक्कम मंजूर करून देण्यासाठी १ लाख २० हजार र

राहुरीतील ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र उंडे यांना राज्यस्तरीय ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२६’ प्रदान; महात्मा फुले कृषी विद्यापीठात भव्य सोहळा
सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या    
चौथ्या दिवशीही देवळाली प्रवरा परिसर ड्रोनच्या दहशतीखाली; पोलिसांच्या निष्क्रियतेवर नागरिकांचा संताप
५०० रुपयांच्या लाचेची मागणी, ३०० वर तडजोड; एसीबीने मुख्याध्यापिकेला रंगेहाथ  पकडले Chhatrapati sambhajinagar Marathi News | ACB Trap in Chhatrapati  Sambhajinagar: Principal Maria ...

अहिल्यानगर : राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या शेतजमिनीच्या भूसंपादन मोबदल्याची रक्कम मंजूर करून देण्यासाठी १ लाख २० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी श्रीगोंदा-पारनेर विभागाच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयातील तत्कालीन महसूल सहाय्यक मंगेश विजय दुमणे आणि कंत्राटी कर्मचारी अमोल कानिफनाथ खामकर यांच्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीगोंदा तालुक्यातील जंगलेवाडी येथील तक्रारदार व त्यांच्या कुटुंबीयांची सुमारे पावणेचार एकर शेतजमीन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डी अंतर्गत उड्डाणपूल उभारणीसाठी संपादित करण्यात आली होती. या जमिनीच्या बदल्यात शासनाने अंतिम आणि पुरवणी आदेशानुसार एकूण १ कोटी ४७ लाख रुपयांचा मोबदला व नुकसानभरपाई मंजूर केली होती. मात्र, मंजूर झालेल्या रक्कमेच्या प्रलंबित प्रक्रियेसाठी आणि निधी हस्तांतरण आदेश (Fund Transfer Order) जारी करण्यासाठी संबंधित कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी पैशांची मागणी केल्याचा आरोप आहे.

तक्रारदाराने या संदर्भात कार्यालयात पाठपुरावा केला असता, काम पूर्ण करून देण्यासाठी १ लाख २० हजार रुपयांची लाच मागण्यात आली. तसेच निधी हस्तांतरण आदेश मंजूर करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही पैसे द्यावे लागतील, असे सांगून रक्कमेची मागणी केल्याचे तपासात समोर आले आहे. तक्रारदाराने याबाबीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. त्यानंतर विभागाच्या पथकाने सापळा रचून मागणीची पडताळणी केली. पडताळणी दरम्यान दोन्ही आरोपींनी संगनमताने लाचेची मागणी केल्याचे आणि रक्कम स्वीकारण्यास तयारी दर्शवल्याचे निष्पन्न झाले. या निष्कर्षांच्या आधारे दोन्ही आरोपींविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसीबीच्या पथकाने ही कारवाई केली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

COMMENTS