Homeताज्या बातम्या

गोपाळचावडी व बाबुळगाव ग्रामपंचायतींचे वार्ड आरक्षण जाहीर

नांदेड : आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गोपाळचावडी व बाबुळगाव ग्रामपंचायतींचे वार्डनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. जिल्हाधिकार

जिल्हाधिकार्‍यांची अर्धापूर तहसील कार्यालयास अचानक भेट
गोपाळचावडी व बाबुळगाव ग्रामपंचायतींचे वार्ड आरक्षण जाहीर; १७ जून रोजी हरकतींसाठी विशेष बैठक
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा गोदावरी पात्रातील अवैध वाळू उत्खननावर मध्यरात्री छापा; 30 लाखांचा मुद्देमाल जप्त
जळगाव : 1131 ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाचे आरक्षण येत्या सोमवारी जाहीर होणार


नांदेड : आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गोपाळचावडी व बाबुळगाव ग्रामपंचायतींचे वार्डनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अधिपत्याखाली, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांच्या आदेशानुसार तसेच तहसीलदार संजय वारकड यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसभेत आरक्षण प्रक्रिया पार पडली.
गोपाळचावडी ग्रामपंचायतीची 2012 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या 4 हजार 68 असून सदस्यसंख्या 11 आहे. ग्रामपंचायतीत एकूण चार वार्ड असून 11 जागांपैकी 6 जागा महिलांसाठी तर 5 जागा पुरुषांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. मंडळ अधिकारी संतोष आकुसकर, तलाठी योगिता अन्नमवार व ग्रामसेवक वर्षा पाटील यांच्या उपस्थितीत ग्रामसभा घेण्यात आली. यावेळी माजी सरपंच सुरेखा प्रदीप लाखे, माजी उपसरपंच साहेबराव शेलूरकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, बाबुळगाव ग्रामपंचायतीचेही वार्ड आरक्षण जाहीर करण्यात आले. 2011 च्या जनगणनेनुसार गावाची लोकसंख्या 2,870 2 हजार 8 70 असून सदस्यसंख्या 9 आहे. तीन वार्ड असलेल्या या ग्रामपंचायतीत 9 जागांपैकी 5 जागा महिलांसाठी व 4 जागा पुरुषांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. यामध्ये अनुसूचित जातीसाठी 1, इतर मागासवर्गीयांसाठी 2 तर उर्वरित 6 जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. बाबुळगाव येथे झालेल्या ग्रामसभेस मंडळ अधिकारी संतोष आकुसकर, तलाठी योगिता अन्नमवार व ग्रामसेवक राजू कदम उपस्थित होते. यावेळी माजी सरपंच पुंडलिक मस्के, दत्ता मोरे, पोलीस पाटील संतोष मोरे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. घोषित करण्यात आलेल्या वार्ड आरक्षणासंदर्भातील हरकती व सूचना स्वीकारण्यासाठी 17 जून रोजी ग्रामपंचायत कार्यालयात विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. तसेच 19 ते 25 जून या कालावधीत हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. आरक्षण प्रक्रियेदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकार चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार मारुती माने व बापूराव जाधव यांनी बंदोबस्त ठेवला होता.

COMMENTS