Homeताज्या बातम्या

खापर पांगरी येथे पशुगृह स्वच्छता व निर्जंतुकीकरण प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न

बीड : महाविद्यालय, बीड येथील विद्यार्थ्यांनी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत खापर पांगरी ता. जि. बीड येथे पशुगृह (गोठा) स्वच्छता व न

सोलापूर येथील राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी बीडचे कुमार व मुलींचे संघ रवाना
कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक चर्चा15 तारखेपर्यंत अर्ज निकाली काढण्याचे आश्वासन
अंधविश्वासांना बळी न पडता वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारावामानसतज्ञ व समुपदेशक मनीषा बिक्कड- घुले यांचे प्रतिपादन


बीड : महाविद्यालय, बीड येथील विद्यार्थ्यांनी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत खापर पांगरी ता. जि. बीड येथे पशुगृह (गोठा) स्वच्छता व निर्जंतुकीकरण प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन केले.
पशुधनाचे आरोग्य सुदृढ राखणे, संसर्गजन्य रोगांचा प्रसार रोखणे तसेच पशुपालकांमध्ये स्वच्छ व वैज्ञानिक पशुगृह व्यवस्थापनाविषयी जनजागृती करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. हा उपक्रम महाविद्यालयाचे सचिव डॉ. जी. व्ही. साळुंके सर, प्राचार्य डॉ. एस. पी. मोरे सर, कार्यक्रम अधिकारी प्रा. ए. पी. ढोरमारे सर, प्रा. डी. बी. राठोड सर तसेच विषय शिक्षक प्रा. कल्याण नगरगोजे सर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडला. कार्यक्रमासाठी गावचे सरपंच तसेच ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी पशुगृहातील स्वच्छतेचे महत्त्व, अस्वच्छतेमुळे उद्भवणारे विविध संसर्गजन्य आजार, कीटक व परोपजीवी नियंत्रण तसेच पशुधनाच्या आरोग्यावर होणारे परिणाम याविषयी पशुपालकांना मार्गदर्शन केले. पशुगृहातील शेण व सांडपाण्याची योग्य विल्हेवाट, नियमित स्वच्छता, हवेशीर व्यवस्था तसेच निर्जंतुकीकरणासाठी योग्य औषधांचा वापर करण्याचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांनी पशुगृह स्वच्छता व निर्जंतुकीकरणाचे प्रात्यक्षिक सादर केले. पशुपालकांनी स्वच्छ व रोगमुक्त पशुगृह राखण्यासाठी नियमित स्वच्छता व निर्जंतुकीकरण करण्याचा संकल्प व्यक्त केला. या कार्यक्रमात गावातील पशुपालक, शेतकरी, ग्रामस्थ तसेच विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

COMMENTS