Homeताज्या बातम्या

ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा केंद्र सुरू; जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र कक्षाची स्थापना

बीड : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड आणि जिल्हा रुग्णालय, बीड यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दि. 11 जून 2026 रोजी ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविध

मनात देशभक्ती आणि सेवाशक्ती असावी ः प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे
जातीय तेढ निर्माण केल्यास कारवाई : पोलिस महासंचालक रजनीश सेठ
गाळप हंगामात ऊस वाहतूकदार संपावर जाण्याच्या तयारीत


बीड : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड आणि जिल्हा रुग्णालय, बीड यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दि. 11 जून 2026 रोजी ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा केंद्राची स्थापना करण्यात आली. जिल्हा रुग्णालय परिसरात सकाळी 10 वाजता आयोजित कार्यक्रमात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष दिनेश पी. सुराणा यांच्या हस्ते केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डॉ. वहाब ए. सय्यद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतिशकुमार साळुंके, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश चव्हाण, अधीक्षक एस. टी. शिंदे तसेच दोन्ही विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान एका वृद्ध महिलेला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने साडी-चोळी आणि वॉकर प्रदान करण्यात आला. तसेच त्यांची लोकनेते गोपीनाथराव मुंडे वृद्धाश्रम येथे राहण्याची व्यवस्था करण्यात आली. उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना दिनेश पी. सुराणा यांनी सांगितले की, नालसा (छ-ङड-) ज्येष्ठ नागरिकांसाठी कायदेशीर सेवा योजना-2016 अंतर्गत वृद्ध नागरिकांना कायदेशीर मदत, वैद्यकीय सहाय्य, विविध शासकीय योजनांचा लाभ आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण मिळावे या उद्देशाने या सुविधा केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. गरजू आणि ज्येष्ठ नागरिकांनी या केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. वहाब ए. सय्यद यांनी केले, तर डॉ. नागेश चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयातील शासकीय नर्सिंग कॉलेज परिसरात दिनेश पी. सुराणा यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रमही संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विधीदूत तत्वशिल कांबळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन विधीदूत अशोक तांगडे यांनी मानले.

COMMENTS