Homeताज्या बातम्या

कर्जत-मिरजगाव परिसरात दारू विक्रेत्यांवर कारवाई  ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त मोहीम

कर्जत : अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने कर्जत व मिरजगाव पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अवैध दारूविक्री करणाऱ्यांविरोधात धडक कारवा

पाथर्डी पोलिसांचा अवैध दारू व्यवसायावर छापा; गावठी हातभट्टी उद्ध्वस्त करून आरोपीला अटक
सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या    
खरवंडी परिसरात स्वतंत्र पोलिस ठाण्याची स्थापना करावी : आव्हाड

कर्जत : अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने कर्जत व मिरजगाव पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अवैध दारूविक्री करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करत सात गुन्हे दाखल केले. या कारवाईत ५५ हजार ५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी विशेष पथकाची नियुक्ती करून जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग यांच्या नेतृत्वाखालील पथकाने १० जून रोजी कर्जत व मिरजगाव परिसरात छापेमारी मोहीम राबविली.
या मोहिमेत पोलीस अंमलदार शामसुंदर सागर ससाणे, आकाश काळे, भाऊसाहेब काळे तसेच चालक चंद्रकांत कुसळकर यांचा सहभाग होता. पथकाने कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच, तर मिरजगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन अशा एकूण सात ठिकाणी छापे टाकले.
कारवाईदरम्यान अवैधरीत्या दारूविक्री करणाऱ्यांविरुद्ध संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ४७ हजार २४५ रुपयांचा, तर मिरजगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ७ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून, आगामी काळातही अशाच प्रकारच्या धडक कारवाया सुरू राहणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली.

COMMENTS