Homeव्हिडीओ

काव्याची उत्कृष्ट कामगिरी,आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत रौप्य पदक!

https://youtu.be/P2Z6Mxd_eho नेपाळ येथे पार पडलेल्या आंतराराष्ट्रीय कराटे स्पर्धेत भारतीय संघाकडून काव्याने रौप्य पदक मिळवत गंधर्वगड गावच्या शिर

आदर्शगाव वंजारवाडीत गुणवंत विद्यार्थी व मान्यवरांचा उत्साहात सत्कार
माजी आ.तांबे ‘साने गुरुजी जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित  
सामाजिक कार्याची दखल; शांताराम गणेश खुडे यांना महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार 2026 जाहीर

नेपाळ येथे पार पडलेल्या आंतराराष्ट्रीय कराटे स्पर्धेत भारतीय संघाकडून काव्याने रौप्य पदक मिळवत गंधर्वगड गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.तिच्या या यशामुळे चंदगड तालुक्याचे नाव जागतिक स्तरावर नावाजले असून तिला विविध स्तरातून अभिनंदनपर शुभेच्छा दिल्या जात आहेत.काव्या ही गंधर्वगड गावचे रहिवासी सुनील जानबा होडगे यांची कन्या आहे.ती आपल्या कुटूंबासोबत रत्नागिरी येथे राहायला असून ए.पी.एस पब्लिक स्कूल आंबोली येथे शिकत आहे.तिने अतिशय मेहनतीने यश संपादन केले असून यासाठी तिला आई वडील व प्रशिक्षक सोनू जाधव, प्राचार्य विलास मोरे,मंगल मोरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.याआधीही काव्याने सांगली,सिंधुदुर्ग,कोल्हापूर,कर्नाटकमध्ये जुडो कराटे स्पर्धेत विविध यश संपादन केले असून सुवर्ण,रौप्य व कांस्य पदक मिळवत उत्कृष्ठ कामगिरी केली आहे.गंधर्वगड ग्रामस्थांकडून गावामध्ये सत्कारसोहळा पार पडला.या सोहळ्यात काव्याचा शाल, श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.याप्रसंगी जेष्ठ नेते गोपाळराव पाटील,चंदगड नगरपंचायतचे नगराध्यक्ष सुनील काणेकर,सभापती विलास नाईक,सरपंच अनंत कांबळे,रवळू करंबळकर,अध्यापक मोहन सुतार,पुंडलिक धुळप,विनायक यादव,मधुकर साळोखे,सहदेव साळोखे,मष्णू यादव,रावजी होडगे,मनोहर धुळप,अर्जुन होडगे,परशू कदम यासंह विविध मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.या अत्यंत कमी वयामध्ये उत्तुंग यश मिळविलेल्या काव्याचे उपस्थित मान्यवराकडून कौतुक करण्यात आले.एकंदरीत तिच्या या यशाबद्दल गंधर्वगड गावची शान वाढली असून भागातून मोठा प्रतिसाद पाहायला मिळत आहे

COMMENTS