Homeताज्या बातम्या

 रेल्वेची मालमत्ता चोरणाऱ्या संघटित टोळीचा पर्दाफाश चौघांना अटक ; ११ लाखांची सामग्री जप्त

देवळाली प्रवरा :  रेल्वे मालमत्ता चोरी करणाऱ्या संघटित टोळीचा पर्दाफाश करत रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) सुमारे ११ लाख ८ हजार ९१२ रुपयांची रेल्वे

चोरट्यांच्या बंदोबस्तासाठी नागरिकच ‘गस्ती’वर ‘अलर्ट सिस्टीम’मुळे सुरक्षा वाढली;प्रवरा पट्ट्यात चोरट्यांचा धुमाकूळ
जामखेडमध्ये आठ लाखांचा अवैध मद्यसाठा जप्तस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; वाहनासह मुद्देमाल ताब्यात
राहुरीत बनावट डॉक्टर; गुन्हा दाखल 
Signaling material worth 11 lakhs seized; Gang of railway property thieves  busted, 4 arrested including 2 from Rahuri by RPF

देवळाली प्रवरा :  रेल्वे मालमत्ता चोरी करणाऱ्या संघटित टोळीचा पर्दाफाश करत रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) सुमारे ११ लाख ८ हजार ९१२ रुपयांची रेल्वे सिग्नलिंग सामग्री जप्त केली असून या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे भारतीय रेल्वेचे मोठे आर्थिक नुकसान तसेच रेल्वे वाहतूक सुरक्षेवरील संभाव्य धोका टळल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.
गुप्त माहितीच्या आधारे आरपीएफ अहिल्यानगरचे निरीक्षक बेनीप्रसाद मीणा यांच्या मार्गदर्शनाखाली आरपीएफ क्राईम ब्रांच सब युनिट दौंडचे पीएसआय एकनाथ गडधे, मुख्य आरक्षक रामनाथ केकान, कॉन्स्टेबल धनंजय यादव तसेच आरक्षक दीपक कर्डीले, विशाल पायघन आणि गुलाब येवले यांच्या पथकाने दौंड हायवेवरील खडकी-चिखली गावांच्या दरम्यान सापळा रचला. संशयित दोन वाहनांची तपासणी केली असता रेल्वेच्या सिग्नल विभागातील महत्त्वाची सामग्री बेकायदेशीररीत्या वाहतूक केली जात असल्याचे उघड झाले.
याप्रकरणी सागर अशोक नवसारे (रा. मुळानगर, ता. राहुरी), नितीन शंकर भालसिंग (रा. वाळकी, जि. अहिल्यानगर) आणि अमोल चंद्रभान पेरणे (रा. तांदुळवाडी, ता. राहुरी) यांना ताब्यात घेण्यात आले.
जप्त करण्यात आलेल्या साहित्यामध्ये सुमारे साडेतीन किलोमीटर लांबीची १२ कोर सिग्नलिंग केबल, ६०० मीटर ६ कोर सिग्नलिंग केबल, सुमारे एक किलोमीटर मिश्रित १२ व ६ कोर केबल, ३९ मीटर जीआय पाइप, एक आर.एस. प्रकारची पॉइंट मशीन तसेच १५० किलो जीएस वायरचा समावेश आहे. या सर्व साहित्याची एकूण किंमत ११ लाख ८ हजार ९१२ रुपये असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.
प्राथमिक चौकशीत संबंधित सिग्नल व दूरसंचार विभागाकडून ही सामग्री हलविण्यासाठी कोणतीही अधिकृत परवानगी किंवा सूचना देण्यात आलेली नसल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर रेल्वे मालमत्ता चोरी झाल्याबाबत संबंधित विभागाने अधिकृत अहवाल सादर केला.
तपासादरम्यान चौथा आरोपी हरिराम चेतराम रायकवार (वायरमन व डेपो इंचार्ज, मूळ रा. हरदुवा मानगड, जि. दमोह, मध्य प्रदेश) याचा सहभाग समोर आला. त्याला विशापूर येथून ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. यामुळे या गुन्ह्यातील चारही आरोपींना अटक करण्यात रेल्वे पोलिसांना यश आले.
“ऑपरेशन रेल सुरक्षा” अंतर्गत करण्यात आलेल्या या कारवाईत चोरीस गेलेली संपूर्ण रेल्वे मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे व तातडीच्या तपासामुळे रेल्वे मालमत्ता चोरीच्या महत्त्वाच्या प्रकरणाचा यशस्वी उलगडा झाला असून शंभर टक्के मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

COMMENTS