Homeताज्या बातम्या

जिल्हास्तरीय आधार नोंदणी समितीची बैठक संपन्नशाळांमध्ये विशेष आधार शिबिरांचे आयोजन करावे-जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन

बीड : जिल्ह्यात आगामी 15 जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणी आणि अद्ययावतीकर

पठान शैजूर नजीम खान यांच्या वलीमा रिसेप्शनला मान्यवरांची उपस्थिती; नवदाम्पत्यावर शुभेच्छांचा वर्षाव
मुप्टा बीड जिल्हा वतीने गुणवंत विद्यार्थी चि. अभिवादन जावळे यांचा गौरव
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेची बैठक संपन्न


बीड : जिल्ह्यात आगामी 15 जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणी आणि अद्ययावतीकरणासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी परस्परांशी समन्वय ठेवून विशेष शिबिरांचे आयोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले.  
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय आधार नोंदणी समितीची बैठक पार पडली. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, विस्तार अधिकारी आर.सी. खोड, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक महेश गोले, महाआयटीचे जिल्हा समन्वयक मनोजकुमार गुंड यांची  प्रमुख तर आधार प्राधिकरणाचे उपसंचालक मंदार जेवरे, कुलदीपसिंग गेहलोत यांची ऑनलाईन उपस्थिती होती.  जिल्हाधिकारी  श्री. जॉन्सन म्हणाले की, शाळा सुरू होण्यापूर्वीच प्रत्येक तालुकानिहाय आणि शाळानिहाय आधार शिबिरांचा एक ठोस मास्टर प्लॅन तयार करावा. ज्या शाळा 15 जूनपासून नियमित सुरू होत आहेत, त्याच ठिकाणी या विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात यावे, जेणेकरून विद्यार्थ्यांना किंवा पालकांना इतरत्र जाण्याची गरज पडणार नाही. तसेच यामध्ये वय 5 आणि 15 वर्ष पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे बायोमॅट्रिक अद्ययावतीकरण करण्यावर विशेष भर दिला जावा. संपूर्ण प्रक्रिया राबविताना शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे व निर्देशांचे काटेकोरपणे पालन केले जावे. अनेक शासकीय योजना, शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक प्रक्रियांसाठी विद्यार्थ्यांचे आधार कार्ड लिंक असणे आणि ते अद्ययावत असणे अत्यंत आवश्यक आहे. शाळा सुरू होताच पहिल्या दिवसापासूनच या मोहिमेला गती दिल्यास कोणताही विद्यार्थी शासकीय लाभांपासून वंचित राहणार नाही, असा विश्वासही जिल्हाधिकारी श्री.जॉन्सन यांनी यावेळी व्यक्त केला आहे. तसेच सध्या सुरु असलेल्या सीबीएसई तसेच आयसीएसई शाळेत आजपासून नियोजन करुन शिबीराचे आयोजन करावे. भारतीय पोस्ट खात्याने त्यांच्याकडे उपलब्ध असलेले ग्रामीण डाकसेवक यांच्यामार्फत या कामात मदत करावी, अशी सुचनाही त्यांनी केली.  जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी महिला व बाल विकास, शिक्षण, भारतीय टपाल खाते, जिल्हा आरोग्य विभाग यासह सर्व संबंधित यंत्रणांनी परस्परांशी समन्वय ठेवून हा मास्टर प्लॅन तात्काळ अंमलात आणण्याचे आदेश दिले असून, हलगर्जीपणा करणार्‍यांवर कारवाईचा इशाराही दिला आहे.

COMMENTS