Homeताज्या बातम्या

चंदगड-जांबरे रस्त्याची झाली दुरावस्था; लोकप्रतिनिधींची जाहिरातबाजी हवेत!। लोकमंथन News२४

https://www.youtube.com/watch?v=XnMAJp-lRXM एकीकडे शासन राज्यभरात महामार्गांचे जाळे विणत असल्याचा दावा करत आहे, मात्र दुसरीकडे कोल्हापूर जिल

चंदगडला निघणाऱ्या इंदुमती ट्रॅव्हल्सचा भोंगळ कारभार,प्रवाशांची गैरसोय!
आ.संजय गायकवाडांवर खा.छत्रपती शाहू महाराजांचा संताप
चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत ‘राजकीय’ राडा; विजय पाटकरांचा थेट मंत्र्यांच्या OSD वर खळबळजनक आरोप, क्रांती रेडकर-निशिगंधा वाड यांचे फॉर्म रोखल्याचा दावा!

एकीकडे शासन राज्यभरात महामार्गांचे जाळे विणत असल्याचा दावा करत आहे, मात्र दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील नागरिकांना रोज मृत्यूच्या छायेत प्रवास करावा लागतोय. चंदगड ते जांबरे या मुख्य मार्गाची अवस्था इतकी बिकट झाली आहे की, येथे खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून वाहनधारकांचा जीव मुठीत आहे.
चंदगड ते जांबरे… हा केवळ एक रस्ता नाही, तर कोकरे, आडूरे, न्हावेली, जांबरे आणि उमगाव या अनेक गावांसाठी दळणवळणाची मुख्य वाहिनी आहे. मात्र, सध्या या वाहिनीला खड्ड्यांचे ग्रहण लागले आहे. रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे दररोज छोटे-मोठे अपघात घडत आहेत. स्थानिक ग्रामस्थांच्या मते, कित्येक वर्षांपासून या रस्त्याची साधी डागडुजीही करण्यात आलेली नाही. प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे अजून किती बळी जाण्याची वाट पाहिली जात आहे? असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे.

COMMENTS