Homeताज्या बातम्या

कल्याणमध्ये किरकोळ कारणावरून गोळीबार; व्हॉट्सॲप डीपी आणि स्टेटसचा वाद बेतला जीवावर

ठाणे : कल्याणमध्ये व्हॉट्सॲप डीपी (DP) आणि स्टेटसवर फोटो ठेवण्याच्या किरकोळ कारणावरून गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या वादातून एका तर

पंजाबमध्ये भीषण अपघात; एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू, १५ हून अधिक जखमी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे कार्य प्रेरणादायी; प्रा. टी. ई. शेळके यांचे प्रतिपादन
अमृतवाहिनी तंत्रनिकेतनमध्ये डिप्लोमा प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्राचा शुभारंभ; पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Kalyan Crime: व्हॉट्सअॅप स्टेटसच्या वादातून कल्याणमध्ये गोळीबार! तरुणावर  फायरिंग केल्यानंतर आरोपीने स्वतःवरच झाडली गोळी | Navarashtra

ठाणे : कल्याणमध्ये व्हॉट्सॲप डीपी (DP) आणि स्टेटसवर फोटो ठेवण्याच्या किरकोळ कारणावरून गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या वादातून एका तरुणावर गोळीबार करण्यात आला. त्यानंतर मुख्य आरोपीने स्वतःवरही गोळी झाडून घेतल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून मुख्य आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.

कल्याण पश्चिमेतील मोहने परिसरात राहणारा अभिषेक पवार उर्फ अभी आणि गौरव साळुंखे यांच्यात जुना वाद होता. या जुन्या वादातून आणि व्हॉट्सॲप स्टेटसच्या कारणावरून हा गोळीबार झाल्याचे बोलले जात आहे. खडकपाडा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

COMMENTS