Homeताज्या बातम्या

वक्फ मंडळाचे अद्यावत संग्रहालय पुन्हा पर्यटकांच्या सेवेत सुरूसंशोधनासाठी एक हजार पुस्तकांचे वाचनालयही लवकरच सुरू होणार

ऐतिहासिक पाणचक्की येथील संग्रहालयाचे आधुनिकीकरण पूर्ण करण्यात आले असून ते पुन्हा एकदा देश-विदेशातील पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. राज्य वक्फ

संतांचे विचार जीवनाला दिशा देतात-गीतांजली झेंडेबीडमध्ये ’अधिकमास महात्म्य कथा’ सोहळा उत्साहात
‘क्रिकेटपटू श्रद्धाळू की अंधश्रद्धाळू ?’ पुस्तकाचे प्रकाशन
’पोश्टर पैलवान’ कथासंग्रह म्हणजे दिखाऊ प्रवृत्तीचे मर्मभेदी चित्रण : डॉ.बाबुराव उपाध्ये


ऐतिहासिक पाणचक्की येथील संग्रहालयाचे आधुनिकीकरण पूर्ण करण्यात आले असून ते पुन्हा एकदा देश-विदेशातील पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. राज्य वक्फ मंडळाचे अध्यक्ष समीर काझी यांच्या उपस्थितीत संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी बोलताना समीर काझी यांनी पाणचक्की येथे राष्ट्रीय स्तरावरील वाचनालय लवकरच जनतेच्या सेवेत सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली. विविध विषयांवरील सुमारे एक हजार पुस्तकांचा समृद्ध संग्रह या वाचनालयात उपलब्ध करून दिला जाणार असून, संशोधक व विद्यार्थ्यांसाठी ते उपयुक्त ठरणार आहे. पाणचक्की परिसरात सुमारे तीनशे वर्षांपूर्वी वास्तव्य केलेल्या हजरत बाबाशाह मुसाफिर यांनी धार्मिक सौहार्द आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यांची शिकवण नव्या पिढीपर्यंत पोहोचावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे समीर काझी यांनी सांगितले. संग्रहालयात काबा शरीफ आणि मदिना मुनव्वरा येथील गिलाफ तसेच बाबाशाह मुसाफिर यांनी वापरलेल्या अनेक ऐतिहासिक वस्तू जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. पाणचक्की हे ठिकाण एकेकाळी देश-विदेशातील धार्मिक व सामाजिक विद्वानांच्या ग्रंथसंपदेमुळे प्रसिद्ध होते. सध्या येथे सुमारे दोन हजार हस्तलिखित ग्रंथांचा अमूल्य ठेवा असून, देशभरातून आणखी दुर्मिळ ग्रंथ संकलित करण्याचे काम सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. या कार्यक्रमास वक्फ मंडळाचे सदस्य एयू पठाण, हसनैन शाकिर, इफ्तेखार हाश्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी फैयाज खान, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुशीर अहमद शेख, विशेष अधीक्षक खुसरो खान तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
वाचनालयातील पुस्तके आता ऑनलाइन
वक्फ मंडळाच्या वाचनालयातील पुस्तके लवकरच ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. शहरात येऊ न शकणारे तसेच संशोधनासाठी महागडी पुस्तके खरेदी करणे शक्य नसलेले विद्यार्थी याचा लाभ घेऊ शकतील. सुफीवादासह विविध विषयांवरील प्रकाशित साहित्य, तसेच पर्शियन, उर्दू आणि अरबी भाषेतील ग्रंथ ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुशीर अहमद शेख यांनी दिली. याशिवाय, पैगंबर साहेबांच्या मोहे मुबारकचे दर्शन मोहरम महिन्याच्या 1 ते 10 तारखेपर्यंत श्रद्धाळूंना घेता येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

COMMENTS