Homeताज्या बातम्या

पर्यावरणदिनानिमित्त ठाकरे सेनेकडून तुळशी रोपांचे वाटप    

कोपरगाव शहर : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने कोपरगाव शहरात तुळशीच्या रोपांचे वाटप करून पर्यावरण संवर्धनाचा स

जागतिक पर्यावरण दिन: किनवट वनविभागातर्फे बेंदी रोपवाटिकेत वृक्षलागवड; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
पंतप्रधानांच्या इंधन बचतीच्या आवाहनाला मुख्यमंत्र्यांचा प्रतिसाद; कार सोडून देवेंद्र फडणवीस थेट दुचाकीवरून निवासस्थानाकडे रवाना!
झाडे लावा-झाडे जगवा; पण वाढलेली झाडे वाचविणार कोण?राजुरीवेस ते माळीवेस मार्गावरील झाडांची मोठ्या प्रमाणात छाटणी; नागरिकांमध्ये नाराजी


कोपरगाव शहर : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने कोपरगाव शहरात तुळशीच्या रोपांचे वाटप करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. शहरप्रमुख गगन हाडा यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. शहरातील एस.एस.जी.एम. तथा के. जे. सोमैया महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांना तुळशीची रोपे देण्यात आली.  
शुक्रवारी (दि.५ जून)  शिवसेना कोपरगाव शहर गगन हाडा यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेचे निखिल क्रंकाळे, ऋषी खैरनार, वैभव शेलार, कान्हा हाडा, विनय टाक, आबासाहेब पवार, याकूब शेख, गणेश वहाडणे, ओम् सुरळकर, शंतनू चावरिया, वरुण टाक, रिहान शेख, राहुल लख्खन आदी शिवसैनिक युवासैनिकानी प्राचार्य डॉ विजय ठाणगे,प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांच्या सह सर्व प्राध्यापकांना तुळशीचे रोपे वाटप करत अनोखा उपक्रम राबविला.  
याप्रसंगी गगन हाडा म्हणाले, की विकासाच्या नावाखाली होत असलेल्या मोठ्या प्रमाणातील वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत असून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. पर्जन्यमानात घट होत असल्याने पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारण्याची गरज आहे.
केवळ वृक्षारोपण करून थांबणे पुरेसे नसून लावलेल्या वृक्षांचे संगोपन आणि जतन करणे अधिक महत्त्वाचे आहे. युवकांनी तसेच विद्यार्थ्यांनी पर्यावरणाच्या प्रश्नांविषयी जागरूक राहून वृक्षलागवड आणि संवर्धनासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
तसेच शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाविषयी जनजागृती करून प्रत्येक विद्यार्थ्याकडून किमान एक देशी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याची सवय रुजवावी, असेही हाडा यांनी सांगितले.

COMMENTS