Homeकृषी

गोदावरी कालव्यांना उन्हाळी हंगामाचे अंतिम आवर्तन सोडा  जलसंपदा मंत्री विखेंना आ. आशुतोष काळे यांचे निवेदन

कोपरगाव : गोदावरी कालव्यांना उन्हाळी हंगामात आतापर्यंत केवळ एकच आवर्तन देण्यात आले असून वाढत्या उष्णतेमुळे फळबागा, चारा पिके आणि ऊस शेती धोक्यात

आंबा-काजू उत्पादकांच्या प्रश्‍नावरून आंदोलनराजू शेट्टींसह प्रमुख नेत्यांची पोलिसांकडून धरपकड
कर्जमाफीत शेतकऱ्यांची संतापजनक फसवणूक
तामसा परिसरातील शेतकरी पिकविमा रकमेच्या प्रतीक्षेत; प्रशासनाविरोधात संतापतामसा


कोपरगाव : गोदावरी कालव्यांना उन्हाळी हंगामात आतापर्यंत केवळ एकच आवर्तन देण्यात आले असून वाढत्या उष्णतेमुळे फळबागा, चारा पिके आणि ऊस शेती धोक्यात आली आहे. त्यामुळे गोदावरी कालव्यांना उन्हाळी हंगामातील सिंचनाचे अंतिम आवर्तन तातडीने सोडण्यात यावे, अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आमदार काळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सन २०२५-२६ मध्ये नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यांत सरासरी १५० टक्के पर्जन्यमानाची नोंद झाली. त्यामुळे दारणा-गंगापूर धरण समूहातील सर्व प्रमुख धरणे नोव्हेंबर २०२५ पर्यंत पूर्ण क्षमतेने भरलेली होती. गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातही समाधानकारक पाऊस झाला. मात्र, पावसात सातत्य नसल्याने आणि उष्णतेचे प्रमाण वाढल्याने भूजल पातळीत मोठी घट झाली आहे.
भूजल पातळी घसरल्याचा परिणाम उभ्या पिकांवर होत असून सध्या सिंचनासाठी पाण्याची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे गोदावरी कालव्यांना उन्हाळी हंगामातील आणखी एक आवर्तन देणे अत्यावश्यक असल्याचे काळे यांनी नमूद केले आहे.
निवेदनानुसार, गंगापूर धरणातून गोदावरी कालव्यांसाठी मिळणारे हक्काचे एक टीएमसी पाणी यंदा सोडण्यात आलेले नाही. तसेच १.८ टीएमसी क्षमतेच्या गौतमी-गोदावरी जलाशयातून आणि वालदेवी धरणातूनही कालव्यांसाठी पाणी देण्यात आलेले नाही. उन्हाळी हंगाम ३० जूनपर्यंत सुरू असताना शेतकऱ्यांना उभ्या पिकांसाठी सिंचनाची मोठी गरज भासत आहे.
गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना आवर्तन देण्यासाठी धरण समूहात आवश्यक पाणीसाठा उपलब्ध असल्याचा दावा करत शेतकऱ्यांच्या अडचणींचा विचार करून गोदावरी कालव्यांना उन्हाळी हंगामातील अंतिम सिंचन आवर्तन सोडण्याबाबत जलसंपदा विभागाला आवश्यक सूचना द्याव्यात, अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे.

COMMENTS