https://youtu.be/u9Lre4gRQWA तिबेटमधील शन्नान प्रदेशात निसर्गाचा एक अत्यंत दुर्मिळ आणि थक्क करणारा चमत्कार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पुमा युम्
तिबेटमधील शन्नान प्रदेशात निसर्गाचा एक अत्यंत दुर्मिळ आणि थक्क करणारा चमत्कार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पुमा युम्को सरोवराजवळील एका वादळादरम्यान, आकाशात अचानक ‘रेड स्प्राइट’ नावाचे अद्भूत दृश्य पाहायला मिळाले. प्रसिद्ध ॲस्ट्रोफोटोग्राफर डोंग शूचांग यांनी तब्बल ५,००० मीटरपेक्षा जास्त उंचीवरून हा थरारक व्हिडिओ शूट केला आहे. रात्रीच्या गडद आकाशात अगदी काही मिलिसेकंदांसाठी लाल रंगाचे तेजस्वी स्तंभ आणि जेलीफिशसारखा आकार चमकून गायब झाला. ही अद्भुत घटना जमिनीपासून तब्बल ५० ते ९० किलोमीटर उंचीवर, म्हणजेच वादळाच्या अगदी वरच्या वातावरणात घडते. जेव्हा ढगांमधून जमिनीवर अत्यंत शक्तिशाली वीज कोसळते, तेव्हा वरच्या वातावरणातील नायट्रोजनचे अणू उत्तेजित होऊन हा लाल रंगाचा प्रकाश निर्माण होतो. ही घटना इतक्या वेगाने घडते की ती साध्या डोळ्यांनी पकडणे अशक्य असते, म्हणूनच शूचांग यांनी १२० फ्रेम्स प्रति सेकंद या हाय-स्पीड कॅमेऱ्याचा वापर करून हे दृश्य टिपले आहे. डोंग शूचांग यांनी यापूर्वी २०२२ मध्येही हिमालयात अशा स्प्राइट्सचा मोठा सिलसिला कॅद केला होता, ज्याने वैज्ञानिक संशोधनाला मोठी मदत केली होती. सामान्य विजेच्या अगदी उलट, म्हणजेच वरच्या दिशेने होणारा हा विजेचा प्रवास वैज्ञानिकांसाठी आजही एक मोठे रहस्य आहे. सध्या निसर्गाच्या या अद्भूत आणि रहस्यमय शक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, जगभरातील लोकांना भुरळ घालत आहे.

COMMENTS