Homeताज्या बातम्या

माफिया अन् मच्छर दोघांचाही खात्मा : योगी आदित्यनाथ  

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पक्षावर जोरदार टीका करत राज्यातील कायदा

पंतप्रधानांनी ताफ्यातील वाहनांची संख्या केली कमीकेवळ दोन गाड्या घेऊन पोहोचले कॅबिनेट बैठकीला
आंदोलन की राजकीय महत्त्वाकांक्षा : एक कटाक्ष
बीडमध्ये उपवर्गीकरण विरोधात आंबेडकरी समाजाचा महामोर्चाभाजप सरकारने जाती-जातीत भांडणे लावू नयेत;11 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा


उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पक्षावर जोरदार टीका करत राज्यातील कायदा-सुव्यवस्था, रोजगार आणि विकासकामांबाबत सरकारची भूमिका मांडली. पूर्वीच्या सरकारच्या पापांमुळे गरीब लोक उपाशी राहत होते. माफियामुळे सामान्य जनता त्रस्त होती. उत्तर प्रदेशात सोयीसुविधा नव्हत्या आणि बाहेर अस्मितेचे संकट होते. पण आता असे होणार नाही. आम्ही माफिया अन् मच्छर दोघांचाही खात्मा केला असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ  म्हणाले.  
“जंगल पार्टी’मुळे कुशीनगरला सर्वाधिक फटका बसला. ‘जंगल पार्टी’च्या राजवटीत वीजही नव्हती आणि पाणीही नव्हते. आम्ही माफिया आणि मच्छर या दोघांनाही संपवले. डासांमुळे आजार पसरत होते आणि माफियामुळे बेरोजगारी वाढत होती. रोगराई आणि बेरोजगारीच्या समस्या सोडवल्यामुळे, आज उत्तर प्रदेशात जेव्हा जेव्हा नोकऱ्या उपलब्ध होतात, तेव्हा विविध तरुणांनाही नियुक्तीपत्रे मिळते. डबल-इंजिन सरकारने उत्तर प्रदेशचा चेहरामोहरा बदलला. प्रत्येक सरकारची स्वतःची एक दूरदृष्टी असते. आज मी सांगू शकतो की, तमकुही राजच्या अंतर्गत स्थानिक आमदार विविध योजना आणून परिश्रमपूर्वक काम करतात आणि खासदारही सक्रिय भूमिका बजावतात. तुमच्या मागण्या प्रत्यक्षात आणण्यासाठी आमदार आणि खासदार एकत्र काम करतात,” असे योगी आदित्यानाथ यांनी स्पष्ट केले.
   फाजिलनगरचे नाव बदलण्याचा प्रस्ताव शासनाकडे असल्याची माहिती देताना योगी आदित्यनाथ म्हणाले, ‘‘फाजिलनगरला यापुढे ‘पावागड’ या नावाने ओळख दिली जाईल. भगवान महावीरांना आदरांजली म्हणून हा निर्णय घेण्यात येत आहे. या भागाची परंपरा, संस्कृती आणि वारसा देशभर तसेच जगभर पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाईल.’’  समाजवादी पक्षावर टीका करताना त्यांनी प्रभू रामांविषयी आदर न दाखवल्याचा आरोप केला. अयोध्येतील राममंदिर उभारणीचा उल्लेख करत सांस्कृतिक वारशाच्या जतनासाठी सरकार कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.  

COMMENTS