ओबीसींचे हित राखत मुख्यमंत्र्यांनी जरांगेंचे आंदोलन गुंडाळले! फडणवीसांचे मुत्सद्दी नेतृत्व पुन्हा सिद्ध

Homeताज्या बातम्या

ओबीसींचे हित राखत मुख्यमंत्र्यांनी जरांगेंचे आंदोलन गुंडाळले! फडणवीसांचे मुत्सद्दी नेतृत्व पुन्हा सिद्ध

मुंबई महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात मराठा आरक्षणाचा प्रश्न हा गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत संवेदनशील विषय राहिला आहे. या पार्श्वभूम

दखल – जन सुरक्षा कायदा जनविरोधी नाही !
एव्हढी आदळ आपट कशासाठी?
जाकिया जाफरी : एक समर्पित लढा!
The current image has no alternative text. The file name is: dakhal-2-1-1-1.png

मुंबई महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात मराठा आरक्षणाचा प्रश्न हा गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत संवेदनशील विषय राहिला आहे. या पार्श्वभूमीवर ३० मे रोजी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी पुन्हा एकदा उपोषणाचा मार्ग स्वीकारला. सकाळपासून वातानुकूलित मंडपात बसून त्यांनी सरकारवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, रात्री राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेत सविस्तर चर्चा केली, ज्यानंतर जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले.

या संपूर्ण घटनाक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुत्सद्दी नेतृत्व विशेषत्वाने अधोरेखित झाले आहे. राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न हाताळताना त्यांच्यासमोर दुहेरी आव्हान होते. एकीकडे मराठा समाजाच्या मागण्या आणि दुसरीकडे ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या अधिकारांचे रक्षण करणे. फडणवीस यांनी या दोन्ही घटकांमध्ये कौशल्याने संतुलन राखले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, सरकारने दिलेली सर्व आश्वासने सार्वजनिक आहेत; कोणतीही गुप्त किंवा पडद्यामागील हमी देण्यात आलेली नाही. या भूमिकेमुळे प्रशासकीय पारदर्शकतेचा संदेश गेला. याहून महत्त्वाची बाब म्हणजे फडणवीस यांनी मराठा समाजाला न्याय देताना ओबीसींच्या विद्यमान आरक्षणाला धक्का लागणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही देत ओबीसी समाजाच्या मनातील भीती दूर केली. आंदोलनाचा तणाव वाढू न देता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवत मुख्यमंत्र्यांनी परिस्थिती संयमाने हाताळली, ज्यामुळे त्यांच्या राजकीय परिपक्वतेची सर्वत्र चर्चा होत आहे.

COMMENTS