Homeताज्या बातम्या

आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या वाढदिवसानिमित्त राहुल देशपांडे यांची ‘संगीत संध्या’

कीर्तन व मोफत आरोग्य शिबिराचेही आयोजन नांदेड : नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या वाढदिवसानिमित्त १ जून

नांदेड वाहतूक पोलिसांचा ‘मोबाईल’ टाईमपास; सिग्नल तोडणारे सुसाट, वजीराबादचा ‘दिवा’ आणि उर्वरित शहर अंधारात?
आरोपींसोबत जंगी वाढदिवस आणि फटाक्यांची आतषबाजी; अर्धापूरच्या एपीआयच्या पार्टीमुळे नांदेड पोलीस दलाची प्रतिष्ठा चव्हाट्यावर!
नांदेड परिक्षेत्रात पोलिसांची धडक कारवाई; लातूर आणि नांदेड जिल्ह्यात धाडी टाकून १ कोटी ४२ लाखांचा मुद्देमाल जप्त

कीर्तन व मोफत आरोग्य शिबिराचेही आयोजन

नांदेड : नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या वाढदिवसानिमित्त १ जून रोजी विविध सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांच्या बहुप्रतिक्षित ‘संगीत संध्येचे’ विशेष आकर्षण असणार आहे.

नांदेड येथील ए. के. संभाजी मंगल कार्यालयात सायंकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आलेल्या या संगीतमय कार्यक्रमात राहुल देशपांडे आपल्या सुरेल गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहेत. त्यापूर्वी सायंकाळी ५ वाजता आमदार बालाजीराव कल्याणकर याच ठिकाणी नागरिकांच्या भेटीगाठी घेणार असून मतदारसंघातील जनतेशी थेट संवाद साधणार आहेत. त्यांच्या समस्या व सूचना जाणून घेणार आहेत.

दरम्यान, वाढदिवसानिमित्त सकाळी मरळक येथील विमलेश्वर मंदिर परिसरात धार्मिक व सामाजिक उपक्रम पार पडणार आहेत. सकाळी साडेदहा वाजता हरिभक्त परायण विशाल महाराज खोले यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होणार असून, याच वेळी नागरिकांसाठी मोफत भव्य आरोग्य तपासणी शिबिरही आयोजित करण्यात आले आहे. मतदारसंघात सातत्याने विकासकामे राबविणारे आ. बालाजीराव कल्याणकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सर्व कार्यक्रमांना नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख गंगाधर बडूरे आणि जिल्हाप्रमुख उमेश मुंडे यांनी केले आहे.

COMMENTS