मुंबई : देशभरात सातत्याने वाढत असलेल्या इंधनाच्या दरांनी सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून, आता या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. राष्ट्रव

मुंबई : देशभरात सातत्याने वाढत असलेल्या इंधनाच्या दरांनी सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून, आता या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी इंधन दरवाढीवरून सत्ताधारी महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे. राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर आकारला जाणारा व्हॅट (VAT) आणि सरचार्ज रद्द केल्यास इंधनाचे दर लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतात, असे मत त्यांनी व्यक्त केले असून, यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही लिहिले आहे.

COMMENTS