बीड : शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध जुगारविरोधी मोहिमेअंतर्गत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. नगर रोड परिसरातील बालेपीर भागात सुरू असलेल

बीड : शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध जुगारविरोधी मोहिमेअंतर्गत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. नगर रोड परिसरातील बालेपीर भागात सुरू असलेल्या ऑनलाईन चक्री जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून, सुमारे ५५,१५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
२६ मे २०२६ रोजी सायंकाळी ७:४० वाजताच्या सुमारास शिवाजीनगर पोलिसांच्या पथकाने नगर रोडवरील ‘मुज्जू कुशन वर्क’च्या पाठीमागे असलेल्या पत्र्याच्या शेडजवळ अचानक छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच काही जण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. मात्र, पोलिसांनी सतर्कता दाखवत गणेश हरीशचंद्र लाटे (वय ३६, रा. बेलुरा, ता. जि. बीड) या संशयिताला जागीच ताब्यात घेतले. तो संगणकाच्या माध्यमातून ऑनलाईन चक्री जुगार चालवत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
या छाप्यात पोलिसांनी संगणक संच, इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि रोख रक्कम असा एकूण ५५,१५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई प्रभारी पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके, उपविभागीय पोलीस अधिकारी व्यंकटराम, पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार संतोष राऊत, शिवदास घोलप, रवींद्र राघव, ज्ञानेश्वर मराडे यांच्या पथकाने केली.

COMMENTS