Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रीय महामार्ग अतिक्रमण कारवाईत दुजाभाव; गरिबांच्या टपऱ्या काढल्या, मोठ्यांच्या माड्या शाबूत

जामखेड : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमण हटविण्याची बहुप्रतीक्षित मोहीम दि. २६ मे रोजी नगरपरिषद प्रशासनाने सुरू केली. मात्र, हे

मुंबईच्या आरे कॉलनीतील जुन्या दर्ग्यावर बीएमसीने चालवला हातोडा; वारिस पठाण यांचा प्रशासनावर गंभीर आरोप
व्हीआयपी रोडवरील बेशिस्त पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष?वाहतूक कोंडी करून सुद्धा गोदावरी हॉटेलला प्रशासनाचे पांघरूण?
अतिक्रमण हटाव मोहिमेत भेदभाव नको; सर्वांवर समान कारवाई करा-रतन गुजर

जामखेड : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमण हटविण्याची बहुप्रतीक्षित मोहीम दि. २६ मे रोजी नगरपरिषद प्रशासनाने सुरू केली. मात्र, हे अतिक्रमण काढताना जाणीवपूर्वक भेदभाव केला असून गोरगरिबांच्या टपऱ्या काढल्या, पण मोठ्या लोकांच्या माड्या तशाच शाबूत ठेवल्याची तीव्र टीका नागरिकांमधून होत आहे. प्रशासनाने निवडक कारवाई न करता सर्व अतिक्रमणांवर समान पद्धतीने बुलडोझर चालवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी विधानभवनात विशेष बैठक घेऊन राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीतील अतिक्रमण हटवण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. त्यानंतर बीड कॉर्नर ते खर्डा चौक या १२० मीटर परिसरातील अतिक्रमण नगरपरिषद प्रशासनाकडून हटवण्यास सुरुवात करण्यात आली. परंतु, रस्त्याच्या कामात अडथळा ठरणाऱ्या पक्क्या इमारतींचे अतिक्रमण काढणे अपेक्षित असताना, अधिकाऱ्यांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने प्रशासनाच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. जामखेडमधील ही मोहीम फक्त ‘धातूरमातूर’ झाल्याची चर्चा सध्या शहरात सुरू आहे.

प्रशासनाच्या कारवाईवर अविश्वास – अवधूत पवार “सभापती प्रा. राम शिंदे यांच्या सूचनेनंतर बीड कॉर्नर ते खर्डा चौक दरम्यानची कारवाई स्वागतार्ह आहे. मात्र वास्तव पाहता समर्थ हॉस्पिटल, बीड रोड ते बीड कॉर्नर या भागातील निश्चित केलेल्या हद्दीनुसार पक्क्या अतिक्रमणांवरही कारवाई होणे क्रमप्राप्त होते. तसे न झाल्याने पुन्हा एकदा धनदांडग्यांना वाचवून सर्वसामान्यांवर अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली आहे. कारवाई सर्वांसाठी समान असावी, नियम गरिबांसाठी वेगळे आणि श्रीमंतांसाठी वेगळे नसावेत,” असे सामाजिक कार्यकर्ते अवधूत पवार यांनी म्हटले आहे.

COMMENTS