Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीरामपूर तालुक्यात बंदुकीतून हवेत गोळीबार करत चोरट्यांना पिटाळले; श्रीरामपूर तालुक्यातील वाबळे वस्तीवरील थरार

श्रीरामपूर : बेलापूर-उक्कलगाव रोडवरील वाबळे वस्तीवर चोरीच्या उद्देशाने दबा धरून बसलेल्या सहा चोरट्यांना एका धाडसी शेतकऱ्याने आपल्या परवानाधारक बं

ओमकारचा अपघाती मृत्यू की घातपात?न्याय मिळवून देण्यासाठी आजोबांची आर्त हाकमृतदेह पोलीस ठाण्यासमोर आणत आंदोलन
सुरत-चेन्नई महामार्गग्रस्त शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळावा; बाळासाहेब थोरातांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींशी चर्चा
वीज ग्राहकांच्या तक्रारी तत्काळ सोडवा, टाळाटाळ करणाऱ्यांना पाठीशी घालू नका; आमदार आशुतोष काळेंच्या महावितरणला कडक सूचना
पुण्यातील मंगळवार पेठेत गोळीबार; दोघे दुचाकीवरुन आले अन्… | Navarashtra

श्रीरामपूर : बेलापूर-उक्कलगाव रोडवरील वाबळे वस्तीवर चोरीच्या उद्देशाने दबा धरून बसलेल्या सहा चोरट्यांना एका धाडसी शेतकऱ्याने आपल्या परवानाधारक बंदुकीतून फायर करून पळवून लावल्याची घटना सोमवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. तालुक्यातील बेलापूरसह प्रवरा नदीकाठच्या परिसरात सलग तीन दिवसांपासून संशयित चोरट्यांच्या हालचालींमुळे नागरिकांची झोप उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बेलापूर-उक्कलगाव मार्गावरील शिवाजी पाटील वाबळे यांच्या वस्तीलगत काल रात्री साडेआठच्या सुमारास सहा जण संशयास्पदरीत्या लपून बसलेले घरच्यांच्या निदर्शनास आले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी तातडीने नातेवाईक व ग्रामस्थांशी संपर्क साधला. काही तरुण तत्काळ मदतीसाठी धावून आले. यावेळी परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन शिवाजी पाटील वाबळे यांनी आपल्या परवानाधारक बंदुकीतून हवेत एक राऊंड फायर केला. गोळीबाराचा आवाज ऐकताच संबंधित संशयित चोरटे दोन मोटरसायकलींवरून अंधाराचा फायदा घेत पसार झाले.

परिसरात ड्रोनच्या फिरण्यामुळे भीतीचे वातावरण: गेल्या ३ ते ४ दिवसांपासून बेलापूर, केसापूर, आंबी, दवणगाव तसेच सातभाई वसाहत परिसरात रात्रीच्या वेळी आकाशात एकाच वेळी तीन ड्रोन फिरताना दिसत असल्याची चर्चा आहे. दोन दिवसांपूर्वी काही नागरिकांनी संशयितांना पकडण्याचा प्रयत्न केला होता; मात्र संबंधित इसम मोटरसायकल सोडून पसार झाले. संतप्त ग्रामस्थांनी त्या मोटरसायकलींची तोडफोड केल्याचीही माहिती समोर आली आहे.

या पार्श्वभूमीवर बेलापूर आऊट पोस्ट येथे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी ग्रामस्थांची बैठक घेत नागरिकांना धीर दिला. “कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, पोलीस प्रशासन सतर्क असून संशयितांचा लवकरच बंदोबस्त करण्यात येईल,” अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.

COMMENTS