पुणे : पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या पार्श्वभूमीवर विविध संघटना आक्रमक होत असताना पुणे प्रशासनाने शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कडक पावले उ

पुणे : पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या पार्श्वभूमीवर विविध संघटना आक्रमक होत असताना पुणे प्रशासनाने शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कडक पावले उचलली आहेत. आज मंगळवारपासून पुढील १४ दिवसांसाठी शहरात जमावबंदी लागू करण्यात आली असून, पाच किंवा त्याहून अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच मोर्चे, आंदोलने, मिरवणुका आणि सार्वजनिक सभा घेण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.
पुणे पोलिसांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील संबंधित तरतुदींनुसार हे आदेश जारी केले आहेत. आगामी बकरी ईद तसेच इतर सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहरात सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.
पोलिसांच्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी तलवार, भाला, काठी, बंदूक किंवा इजा पोहोचवू शकणाऱ्या वस्तू बाळगण्यास बंदी असेल. तसेच दगड साठवणे, ज्वलनशील किंवा स्फोटक पदार्थ वाहून नेणे, अशा प्रकारांवरही निर्बंध घालण्यात आले आहेत. सार्वजनिक शांतता भंग होईल अशा घोषणा देणे, चिथावणीखोर गीते वाजवणे किंवा कोणत्याही व्यक्तीच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करणे यालाही मनाई करण्यात आली आहे. आक्षेपार्ह फलक, चित्रे किंवा चिन्हांचा वापर केल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

COMMENTS