Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तुकाराम मुंढे यांनी स्वीकारला पदभार; अन्न-औषध प्रशासन विभागाची धुरा खांद्यावर

मुंबई : राज्य प्रशासनातील कडक आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळख असलेले वरिष्ठ आयएएस (IAS) अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आल

तुकाराम मुंढे यांची बदली रद्द करण्याची मागणी; सावली दिव्यांग संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
तुकाराम मुंढेंची बदली रद्द करा; अकोले दिव्यांग क्रांती संघटनेची मागणी
जामखेडमधील भेसळखोरांवर कारवाई करावीजन जागरण युवा मंचची आयुक्त मुंढे यांच्याकडे मागणी

मुंबई : राज्य प्रशासनातील कडक आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळख असलेले वरिष्ठ आयएएस (IAS) अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. यावेळी त्यांच्याकडे ‘अन्न-औषध प्रशासन’ (FDA) विभागाच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली असून, त्यांच्या कारकिर्दीतील ही २५ वी बदली ठरली आहे. त्यामुळे प्रशासकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

काही महिन्यांपूर्वीच त्यांची दिव्यांग कल्याण विभागातून आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन आणि मदत कार्य विभागात नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, त्या पदावर दीड महिनाही पूर्ण होण्यापूर्वी राज्य सरकारने त्यांची नव्या विभागात नियुक्ती केली. यासंदर्भातील आदेश सामान्य प्रशासन विभागाने जारी केले आहेत.

अन्न-औषध प्रशासन विभागावर मागील काही काळात गैरव्यवहार, लाचलुचपत आणि भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. अशा परिस्थितीत तुकाराम मुंढे यांच्यासारख्या कठोर प्रतिमेच्या अधिकाऱ्याकडे या विभागाची जबाबदारी आल्याने मोठ्या प्रशासकीय बदलांची शक्यता व्यक्त केली जात आहे.

यापूर्वी दिव्यांग कल्याण विभागात कार्यरत असताना त्यांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे शासकीय नोकरी मिळवणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली होती. या मोहिमेत अनेक कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यांच्या या निर्णयामुळे राज्य प्रशासनात मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान, दिव्यांग विभागातील कारवाई वेगात सुरू असतानाच मार्च महिन्यात त्यांची बदली करण्यात आली होती. त्यानंतर त्या कारवाईचा वेग कमी झाल्याची चर्चा होती.

आता नव्या विभागात रुजू होताना भ्रष्टाचारमुक्त आणि पारदर्शक कारभार उभा करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. त्यामुळे अन्न-औषध प्रशासन विभागात पुढील काळात कोणते कठोर निर्णय घेतले जातात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

COMMENTS