Homeताज्या बातम्याअहमदनगर

संजीवनी पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश सुविधा केंद्र

कोपरगाव : संजीवनी के. बी. पी. पॉलिटेक्निकमध्ये सन २०२६-२७ च्या प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेसाठी बुधवार (दि. २० मे) पासून प्रवे

श्रीगोंदा-कर्जतमध्ये मुसळधार पाऊस शेती, फळबागा, घरांचे नुकसान
‘ज्ञानेश्वर’च्या तज्ज्ञ संचालकपदी डॉ.क्षितिज घुले व रवींद्र नवले
कर्जत तालुक्यातील राशीनमध्ये वादळी वाऱ्यामुळे अनधिकृत होर्डिंग कोसळून २४ वर्षीय तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू; दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

कोपरगाव : संजीवनी के. बी. पी. पॉलिटेक्निकमध्ये सन २०२६-२७ च्या प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेसाठी बुधवार (दि. २० मे) पासून प्रवेश सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण संचालनालय, मुंबई यांच्या मान्यतेने हे केंद्र सुरू करण्यात आल्याची माहिती प्राचार्य ए. आर. मिरीकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.अद्ययावत संगणक प्रयोगशाळा, सक्षम आंतरजाल सुविधा, प्रशिक्षित प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधणारी व्यवस्था या बाबींचा विचार करून संस्थेची सुविधा केंद्रासाठी निवड करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. इच्छुक विद्यार्थ्यांनी दि. २२ जूनपर्यंत संगणकीय पद्धतीने नोंदणी करून आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेतील गुणांच्या आधारे प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांकडे गुणपत्रिका उपलब्ध नसल्यास मंडळाने दिलेला आसन क्रमांक अथवा संगणकीय गुणपत्रिकेची प्रत सादर करावी लागणार आहे. विद्यार्थ्यांचे गुण संगणकीय प्रणालीद्वारे अर्जावर आपोआप नोंदविले जाणार असल्याचेही मिरीकर यांनी स्पष्ट केले. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ तसेच भारतीय माध्यमिक शिक्षण प्रमाणपत्र मंडळाच्या विद्यार्थ्यांनाही हा नियम लागू राहणार आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया, शिष्यवृत्ती, शैक्षणिक कर्ज, आवश्यक कागदपत्रे तसेच पुढील शैक्षणिक संधींबाबत सविस्तर माहिती केंद्रात उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी तज्ज्ञ प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात आली आहे.सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी अर्ज शुल्क ४०० रुपये तर राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ३०० रुपये निश्चित करण्यात आले आहे. हे शुल्क संगणकीय पद्धतीने भरावे लागणार आहे. अधिक माहितीसाठी प्रा. राहुल भाकरे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य मिरीकर यांनी केले आहे.

COMMENTS