Homeताज्या बातम्याअहमदनगर

  अंगणवाडी मदतनीस महिला कर्मचाऱ्यास मारहाण

पारनेर  : पती-पत्नीच्या नात्याला आणि माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळ येथे उघडकीस आली आहे. जमिनीच्या जुन्य

शेअर्सच्या आमिषाने दीड कोटींची ऑनलाइन फसवणूक  
महानगरपालिकेत पेन्शन असोसिएशनचे धरणेदोन महिन्यांचे कर्मचाऱ्यांचे वेतन व पेन्शन देण्याचे आयुक्तांचे आश्‍वासन
जबरी चोरी करणारी सराईत टोळी जेरबंदस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ; 11 लाखांचा मुद्देमाल जप्त
Anganwadi Sevika | अंगणवाडीसेविका, मदतनीसांना सुरक्षा कवच

पारनेर  : पती-पत्नीच्या नात्याला आणि माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळ येथे उघडकीस आली आहे. जमिनीच्या जुन्या वादातून एका ५२ वर्षीय अंगणवाडी मदतनीस महिलेला तिच्याच पतीने, सावत्र मुलाने आणि पुतण्याने शेतात घुसून लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने निर्घृण मारहाण केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या संगिता बाबाजी जांभळकर (वय ५२) यांच्यावर सध्या अहिल्यानगर येथील हराळ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी संगिता जांभळकर या वडगाव सावताळ येथे एकट्या राहून भोंद्र येथे अंगणवाडी मदतनीस म्हणून प्रामाणिकपणे काम करतात. त्यांचे पती बाबाजी जांभळकर यांनी दुसरे लग्न केले असून ते वेगळे राहतात. पतीने संगिता यांना उदरनिर्वाहासाठी दीड एकर जमीन दिली आहे, तर उर्वरित जमिनीचा वाद सध्या कोर्टात सुरू आहे. याच वादाची परिणिती या भयंकर हल्ल्यात झाली.१४ मे रोजी दुपारी संगिता शेतात असताना, पती बाबाजी, सावत्र मुलगा राहुल, पुतण्या शैलेश आणि त्याचा एक अनोळखी मित्र ट्रॅक्टर घेऊन तिथे आले. त्यांनी संगिता यांच्या ताब्यातील जमीन बळजबरीने नांगरण्यास सुरुवात केली. संगिता यांनी याला विरोध केला असता, चौघांनी त्यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. राहुलने लाकडी दांडक्याने तर शैलेशने लोखंडी हत्याराने त्यांच्यावर सपासप वार केले. इतकेच नव्हे तर, मारहाण सुरू असताना संशयितांनी संगिता यांचा मोबाईल आणि गळ्यातील सोन्याचे पोत जबरदस्तीने हिसकावून घेतले व ‘गाव सोडले नाही तर जिवंत सोडणार नाही’, अशी धमकी दिली. या जीवघेण्या हल्ल्यात संगिता गंभीर जखमी होऊन खाली कोसळल्या. घटनेची माहिती मिळताच त्यांच्या मुलीने त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात हलवले. याप्रकरणी पारनेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. 

COMMENTS