Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सत्यपाल महाराज प्रबोधनाच्या वाटवेळावरील अखंड दीपस्तंभ; धोबी समाजाच्या वतीने महाराजांचा वाढदिवस साजरा

नागपूर : समाजप्रबोधनाची परंपरा जपत लोकजागृतीचे कार्य सातत्याने करणारे सप्तखंजिरी वादक तथा प्रबोधनकार श्री सत्यपाल महाराज यांचा ७१ वा वाढदिवस नुकत

भोंदूबाबाला 10 वर्षांची सक्त मजुरी
अशोक खरात प्रकरणात चार मंत्र्यांचा सहभागकाँगे्रस नेते नाना पटोले यांचा थेट गंभीर आरोप
श्रद्धा आणि अंधश्रद्धा…!

नागपूर : समाजप्रबोधनाची परंपरा जपत लोकजागृतीचे कार्य सातत्याने करणारे सप्तखंजिरी वादक तथा प्रबोधनकार श्री सत्यपाल महाराज यांचा ७१ वा वाढदिवस नुकताच उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. ‘सप्तखंजिरी प्रबोधनकार संघ, महाराष्ट्र राज्य’ यांच्या वतीने भट सभागृह येथे आयोजित कार्यक्रमात हा दिवस ‘प्रबोधन दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रबोधन क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष उंची लाभली.

या कार्यक्रमात धोबी समाजाच्या वतीने सत्यपाल महाराजांचा विशेष सत्कार करण्यात आला. धोबी समाजाचे नेते संजय भिलकर यांच्या हस्ते राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या दशसूत्री संदेशाचा फोटो भेट देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात महाराजांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सत्यपाल महाराज यांनी अनेक वर्षांपासून कीर्तन, सप्तखंजिरी वादन आणि लोकप्रबोधनाच्या माध्यमातून समाजजागृतीचे कार्य केले आहे. अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, शिक्षण, सामाजिक समता आणि मानवतेचा संदेश त्यांनी आपल्या कार्यक्रमांतून सातत्याने दिला आहे. ग्रामीण भागापासून शहरांपर्यंत त्यांनी आपल्या प्रभावी शैलीतून सामाजिक परिवर्तनाचा संदेश पोहोचवला आहे.

या कार्यक्रमास माजी गृहमंत्री अनिल देशमुख, ज्ञानेश्वरराव रक्षक, खोडे महाराज, रमेश काळे, विजय लोणारे, गजानन चिंचोलकर, नितीन सरदार, तुषार सूर्यवंशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमात सामाजिक बांधिलकी, प्रबोधन आणि संतविचारांचा प्रभाव स्पष्टपणे जाणवत होता. सत्यपाल महाराजांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत उपस्थितांनी त्यांच्या निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

सत्यपाल महाराजांच्या कार्याचा सार्थ अभिमान – भिलकर धोबी समाजाचे नेते संजय भिलकर यांनी सत्यपाल महाराजांच्या कार्याचा गौरव केला. “आजच्या आधुनिक युगात राष्ट्रसंत गाडगे बाबा, तुकडोजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचे जतन करून, ते मनोरंजनात्मक समाजप्रबोधनातून घराघरांत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य सत्यपाल महाराज सातत्याने करत आहेत. त्यांच्या कार्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे,” असे भावपूर्ण उद्गार त्यांनी काढले.

COMMENTS