Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिर्डीतील शिबिरात १२०० रुग्णांची तपासणी

शिर्डी – श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डी व सुमुखा लक्ष्मी व्यंकटेश्वरा चॅरिटेबल ट्रस्ट, म्हैसूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या दिनांक 11 मे ते 14 मे या चार दिवशीय मोफत त्वचारोग तपासणी व उपचार शिबिराची सांगता उत्साहात झाली. सदर शिबिरामध्ये चार दिवसांत सुमारे १२०० रुग्णांची तपासणी करण्यात आली असून विविध त्वचारोगांवरील २५० प्रोसिजर यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आल्या.  शिबिराच्या सांगता समारंभप्रसंगी श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर   यांच्या हस्ते सुमुखा लक्ष्मी ट्रस्ट म्हेसूरच्या त्वचारोग तज्ज्ञ डॉ. शिवानी व प्लास्टिक सर्जन डॉ.चंदन कुमार यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच श्री साईनाथ रुग्णालयातील त्वचारोग तज्ञ डॉ. दादासाहेब कांबळे व डॉ. श्रद्धा कोते डॉ विवेकानंद पाटील यांचाही उत्कृष्ट सेवेसाठी गौरव करण्यात आला.  रुग्णसेवेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या श्री साईनाथ रुग्णालय श्री साईबाबा हॉस्पिटल मधील प्रणाली सोमन, अनिता कडूस, सुरेखा गायकवाड, तेरेसा गायकवाड, प्रीतम कुमार, बोधक सिताराम, डांगे उषा, बोधक किरण, धोटे सारिका, गावडे सीमा, आहेर जाधव शारदा गाडेकर निलेश कविता पंडित पाबळे प्रसाद या  नर्सिंग स्टाफचा गाडीलकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्तविक सहाय्यक आधीसेविका मंदा थोरात यांनी  तर सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी सुरेश टोलमारे यांनी केले. डॉ चंदन कुमार वैद्यकीय अधीक्षक डॉ. मैथिली पितांबरे यांनी मनोगत व्यक्त केले.  यावेळी उप वैद्यकीय संचालक डॉ, प्रीतम वडगावे, सर्जन डॉ. राम नाईक,कार्यालयीन अधीक्षक काकासाहेब ढेमरे   उपस्थित होते.

एससीमधील उपवर्गीकरण रद्द करा; ऑल इंडिया पँथर सेनेची मागणी; आंदोलनाचा इशारा
माजी आ.नरेंद्र घुले यांनी घेतली दुकळे कुटुंबाची भेट; शोकग्रस्त परिवाराचे केले सांत्वन
महापुरुषांना जातीत अडकवू नका : शहाजी डोके

शिर्डी – श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डी व सुमुखा लक्ष्मी व्यंकटेश्वरा चॅरिटेबल ट्रस्ट, म्हैसूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या दिनांक 11 मे ते 14 मे या चार दिवशीय मोफत त्वचारोग तपासणी व उपचार शिबिराची सांगता उत्साहात झाली. सदर शिबिरामध्ये चार दिवसांत सुमारे १२०० रुग्णांची तपासणी करण्यात आली असून विविध त्वचारोगांवरील २५० प्रोसिजर यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आल्या. 

शिबिराच्या सांगता समारंभप्रसंगी श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर   यांच्या हस्ते सुमुखा लक्ष्मी ट्रस्ट म्हेसूरच्या त्वचारोग तज्ज्ञ डॉ. शिवानी व प्लास्टिक सर्जन डॉ.चंदन कुमार यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच श्री साईनाथ रुग्णालयातील त्वचारोग तज्ञ डॉ. दादासाहेब कांबळे व डॉ. श्रद्धा कोते डॉ विवेकानंद पाटील यांचाही उत्कृष्ट सेवेसाठी गौरव करण्यात आला.

 रुग्णसेवेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या श्री साईनाथ रुग्णालय श्री साईबाबा हॉस्पिटल मधील प्रणाली सोमन, अनिता कडूस, सुरेखा गायकवाड, तेरेसा गायकवाड, प्रीतम कुमार, बोधक सिताराम, डांगे उषा, बोधक किरण, धोटे सारिका, गावडे सीमा, आहेर जाधव शारदा गाडेकर निलेश कविता पंडित पाबळे प्रसाद या  नर्सिंग स्टाफचा गाडीलकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्तविक सहाय्यक आधीसेविका मंदा थोरात यांनी  तर सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी सुरेश टोलमारे यांनी केले. डॉ चंदन कुमार वैद्यकीय अधीक्षक डॉ. मैथिली पितांबरे यांनी मनोगत व्यक्त केले.  यावेळी उप वैद्यकीय संचालक डॉ, प्रीतम वडगावे, सर्जन डॉ. राम नाईक,कार्यालयीन अधीक्षक काकासाहेब ढेमरे   उपस्थित होते.

COMMENTS