अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने नांदेड शहरातील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे आणि विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवी दिशा देणारे शिक

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने नांदेड शहरातील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे आणि विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवी दिशा देणारे शिक्षणतज्ज्ञ मधुसूदन देशमुख यांचा नुकताच आगळ्यावेगळ्या पद्धतीने सत्कार करण्यात आला. महासंघाचे प्रदेशाध्यक्ष निखिल लातूरकर यांनी त्यांना खारीक व खोबर्याचा 25 किलोचा भव्य हार घालून सन्मानित केले.यावेळी एलआयसी चे सेवानिवृत्त अधिकारी दीपक बुलबुले, नयनकुमार बुलबुले, पत्रकार संतोष कुलकर्णी यांची उपस्थिती होती.
मधुसूदन देशमुख हे नांदेड शहरातील सुप्रसिद्ध ‘आर्या गर्ल्स हॉस्टेल’चे संचालक असून, कोचिंग क्षेत्रात त्यांनी अनेक वर्षांपासून भरीव योगदान दिले आहे. देगलूर तालुक्यातील लिगंनकेरूर या छोट्याशा गावातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या देशमुख यांनी संघर्षमय परिस्थितीत शिक्षणाची कास सोडली नाही. एम.ए., बी.एड. पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी शिक्षक म्हणून कारकीर्द सुरू केली; मात्र त्यांचे ध्येय केवळ नोकरीपुरते मर्यादित नव्हते. शिक्षणाच्या माध्यमातून समाजपरिवर्तन घडवण्याची त्यांची तळमळ कायम राहिली. 1998 मध्ये सुरू केलेल्या त्यांच्या क्लासेसने पहिल्याच वर्षी उल्लेखनीय यश मिळवत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची नवी ओळख निर्माण केली. ग्रामीण भागातील मुलींना सुरक्षित, शिस्तबद्ध आणि संस्कारक्षम वातावरणात शिक्षणाची संधी मिळावी या उद्देशाने त्यांनी 2015 मध्ये ‘यश हॉस्टेल’ची स्थापना केली. त्यानंतर 2016 मध्ये ‘आर्या गर्ल्स हॉस्टेल’ सुरू करून मुलींच्या शिक्षणासाठी विश्वासार्ह व्यासपीठ उभे केले. कडक शिस्त, पालकत्वाची भावना आणि आधुनिक सुविधांचा संगम हे या हॉस्टेलचे वैशिष्ट्य ठरले आहे. अभ्यासासोबतच विद्यार्थिनींमध्ये संस्कार, आत्मविश्वास आणि स्वावलंबन रुजवण्यावर विशेष भर दिला जातो. आज राज्यातील विविध भागांतील शेकडो मुली येथे विश्वासाने राहत असून, मधुसूदन देशमुख यांनी शिक्षण क्षेत्रात निर्माण केलेली वेगळी ओळख आणि त्यांचा शिक्षणसेवेचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

COMMENTS