पोलीस ठाणे हद्दीतील मौजे माष्टी येथे दिनांक 8 मे 2026 रोजी सायंकाळी मराठा समाज व दलित बांधवांमध्ये झालेल्या वादातून परस्पर गुन्हे दाखल झाल्याने ग

पोलीस ठाणे हद्दीतील मौजे माष्टी येथे दिनांक 8 मे 2026 रोजी सायंकाळी मराठा समाज व दलित बांधवांमध्ये झालेल्या वादातून परस्पर गुन्हे दाखल झाल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर गावात शांतता व सामाजिक सलोखा कायम राहावा या उद्देशाने दि. 14 मे 2026 रोजी ग्रामपंचायत कार्यालय, माष्टी येथे शांतता कमिटी व सामाजिक सलोखा बैठकीचे आयोजन करण्यात आले.
ही बैठक श्रीमती अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक भोकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळीधर्माबादचे उपविभागीय पोलीस अधिकारी दशरथ पाटील, सुरेखा स्वामी, तहसीलदार धर्माबाद, क्षिरसागर गटविकास अधिकारी धर्माबाद यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीस गावातील 20 ते 25 दलित बांधव, महिला, युवक-युवती तसेच 30 ते 35 मराठा समाजातील पुरुष व महिला उपस्थित होते. बैठकीत गावातील स्मशानभूमीचा प्रश्न, स्वच्छ अँरो पिण्याच्या पाण्याची समस्या, बौद्ध विहारासाठी जागा उपलब्ध करून देणे तसेच दलित वस्तीत पिठाच्या गिरणीची व्यवस्था आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच दोन गटांमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने भविष्यात कोणतीही अडचण निर्माण झाल्यास थेट पोलीस प्रशासन किंवा संबंधित शासकीय विभागाकडे तक्रार करावी, अशा सूचना देण्यात आल्या. नागरिकांच्या तक्रारींचे वेळेवर निराकरण करण्याबाबतही प्रशासनाने आश्वासन दिले. गावातील सार्वजनिक शांतता व सामाजिक ऐक्य टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने ही बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली. पोलीस प्रशासनातर्फे नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले असून बिलोली, धर्माबाद तसेच परिसरातील नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांनी केले.

COMMENTS