Homeताज्या बातम्याबीड

देशहितासाठी जीवनशैलीत बदल गरजेचा; श्री बंकटस्वामी महाविद्यालयात जनजागृती कार्यक्रम संपन्न

oplus_2 येथील श्री बंकटस्वामी महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना (छडड) विभागाच्या वतीने भारताचे पंतप्रधान छरीशपवीर चेवळ यांच्या आवाहनानुसार सार

मृदा, जल आणि वृक्ष संवर्धन केले तरच भविष्य उज्ज्वल – जलनायक मयंक गांधीसरस्वती नदी पुनरुज्जीवन कामाचा शुभारंभ; हजारोंच्या उपस्थितीत संवाद मेळावा संपन्न
एकाच छताखाली विविध शासकीय योजनांचा लाभ; प्रशासन जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र सज्जछत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान समाधान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसादशिबिरे संपली तरी नागरिकांना सेवांचा लाभ कायम मिळणार – जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन
मी सहभागी झाले, आपणही जनगणनेत सहभागी व्हानगराध्यक्षा प्रेमलताताई पारवे यांचे आवाहन
oplus_2



येथील श्री बंकटस्वामी महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना (छडड) विभागाच्या वतीने भारताचे पंतप्रधान छरीशपवीर चेवळ यांच्या आवाहनानुसार सार्वजनिक वाहतुकीचा वापर, इंधन बचत, स्वदेशीचा आग्रह आणि जीवनशैलीत सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
दि. 15 मे 2026 रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर धांडे यांनी सर्व प्राध्यापक व कर्मचार्‍यांना या उपक्रमात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. सध्याच्या जागतिक परिस्थितीत देशाची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी तसेच पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वागणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी कर्मचार्‍यांना महाविद्यालयात येताना शक्य असल्यास सायकलीचा वापर करण्याचे आवाहन केले. तसेच स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देणे, आठवड्यातून किमान दोन वेळा सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे आणि जवळ राहणार्‍या कर्मचार्‍यांनी बाईक शेअरिंग पद्धतीचा अवलंब करावा, असेही त्यांनी सुचविले.कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे जिल्हा समन्वयक डॉ. अरुण दैतकार तसेच राष्ट्रीय छात्र सेना (छउउ) विभागाचे प्रमुख डॉ. जगन्नाथ चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनीही उपस्थितांना सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढविणे, इंधन बचत करणे, पर्यावरण संवर्धनाला प्रोत्साहन देणे आणि स्वदेशी वस्तूंचा अधिकाधिक वापर करण्याचे महत्त्व पटवून दिले. या कार्यक्रमासाठी प्राध्यापिका वर्षाताई भोसले, डॉ. जयद्रथ मगर, डॉ. राम आवारे, प्रा. रणजित आखाडे, प्रा. रमेश वळवी, श्री प्रशांत कोल्हे व श्री गाडे यांची उपस्थिती होती. यावेळी महाविद्यालयात विविध जनजागृती उपक्रम, चर्चासत्रे आणि मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून देशाच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहनही करण्यात आले.

COMMENTS