Homeताज्या बातम्याअहमदनगर

लोणी-राहता गर्भलिंग रॅकेटमध्ये पुणे कनेक्शन  मशीन पुरवणारे पुण्याचे डॉक्टर अटकेत; आरोपींची संख्या १६

अहिल्यानगर : जिल्ह्यातील लोणी येथे उघडकीस आलेल्या गर्भलिंग चाचणी आणि बेकायदेशीर गर्भपात रॅकेटच्या तपासात आता मोठा पुणे कनेक्शन समोर आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आणखी तीन आरोपींना अटक केली असून आरोपींची संख्या आता १६ वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण रॅकेटमध्ये आतापर्यंत पाच डॉक्टरांचा सहभाग समोर आला आहे. लोणी पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या या गुन्ह्यात यापूर्वी १३ आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यामध्ये ३ डॉक्टर, ४ एजंट आणि ६ गर्भवती महिलांचे कुटुंबीयांचा समावेश होता. तपासादरम्यान पोलिसांनी बेकायदेशीर गर्भलिंग निदानासाठी वापरली जाणारी दोन सोनोग्राफी मशीन जप्त केली आहेत. यातील एक मशीन नेवासा येथील आरोपी डॉक्टर भणगे यांच्याकडून, तर दुसरे मशीन आरोपी रवींद्र ढगे याच्याकडून जप्त करण्यात आले. ही दोन्ही मशीन कोणत्याही अधिकृत नोंदणीशिवाय बेकायदेशीररीत्या गर्भलिंग निदानासाठी वापरली जात असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. पोलीस कोठडीत चौकशीदरम्यान आरोपींनी ही प्रतिबंधित मशीन पुणे येथील दोन डॉक्टर आणि एका व्यक्तीकडून खरेदी केल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी काल विशेष पथके रवाना करून रात्री उशिरा तिघांना ताब्यात घेत अटक केली. डॉ. आकाश सुभाष मलगुंडे, डॉ. नीलकंठ अशोक जाधव, नरेंद्र साहेबराव ठाकरे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. दरम्यान, पुण्यातील आरोपींनी ही प्रतिबंधित सोनोग्राफी मशीन नेमकी कुठून आणली? या रॅकेटमध्ये आणखी कोण सहभागी आहेत का? याचा तपास आता लोणी पोलीस करत आहेत. या प्रकरणाचे धागेदोरे राज्यव्यापी नेटवर्ककडे जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

नागपुरात इमारतीत आढळला स्फोटकांचा साठा; पाहा काय आहे सत्य
गँगवॉरच्या छायेत नांदेड पोलिसांचा श्वास गुदमरतोय!1 हजार 500 नागरिकांमागे एकच पोलिस, कायदा-सुव्यवस्था धोक्यात
प.बंगाल निवडणुकीसाठी भाजपचे भरोसा पत्र जाहीरलाडक्या बहिणींना दरमहा 3 हजार, बेरोजगार तरूणांनाही मदत

COMMENTS