Homeताज्या बातम्याअहमदनगर

सुपा येथील वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर मनसे आक्रमकउड्डाणपुलासह सिग्नलची मागणी ; सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन

सुपा : नगर पुणे महामार्गावरील सुपा येथे दररोज होणाऱ्या भीषण वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. या कोंडीचा कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी  महाराष्ट्र नवनिर्माण सेना पारनेर तालुक्याच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे उड्डाणपूल व पर्यायी मार्गाची मागणी करण्यात आली आहे.मनसे तालुकाध्यक्ष अविनाश पवार यांनी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अहिल्यानगर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सुपा येथील शासकीय विश्रामगृह ते सुपा औद्योगिक वसाहत या दरम्यान महामार्गावर दररोज वाहतुकीची कोंडी होते. यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह रुग्णवाहिकांनाही तासन्तास खोळंबून राहावे लागते. इमर्जन्सीच्या वेळी याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात. तसेच महामार्गावरील वाहतूक टाळण्यासाठी अनेक वाहने गावातील छोट्या रस्त्यांवरून जातात. त्यामुळे लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांच्या अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या पार्श्वभूमीवर मनसेने शासकीय विश्रामगृह ते सुपा एमआयडीसीपर्यंत उड्डाणपूल किंवा पर्यायी मार्ग तातडीने करण्यात यावा, सुपा चौकात सर्कल व सिग्नल यंत्रणा बसवून शाळकरी विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेची व्यवस्था करावी या दोन प्रमुख मागण्या केल्या आहेत.नागरिकांच्या जीवाशी खेळ होत असताना प्रशासनाने डोळेझाक करू नये. तातडीने कार्यवाही न झाल्यास मनसे स्टाईलने आंदोलन छेडले जाईल असा इशारा पवार यांनी दिला. यावेळी सुपा शहराध्यक्ष अक्षय सुर्यवंशी, शाखाध्यक्ष रमेश साबळे, पारनेर शहराध्यक्ष सतिश म्हस्के, तालुका सचिव नारायण नरवडे, तालुका उपाध्यक्ष विरेंद्र थोरात यांच्यासह महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

कर्जत तालुक्यात वादळी पावसाचा तडाखापिकांसह घरांचे मोठे नुकसान; एक गाय दगावली
कृत्रिम बुद्धिमत्ता, मानवी संवेदना आणि पारंपरिक ज्ञानाच्या समन्वयातून पशुपालनात भरभराट आणा : पंकजा मुंडेएकात्मिक दुग्धव्यवसाय विकास उपक्रमाचे उद्घाटन; शेतकर्‍यांच्या उत्पन्नवाढीस चालना
देवळाली प्रवरा येथे जनगणना प्रशिक्षण कार्यक्रमअप्पर जिल्हाधिकारी कोळेकर यांचे मार्गदर्शन ; पारदर्शी काम करण्याच्या सूचना

COMMENTS