Homeताज्या बातम्याबीड

शिक्षणाच्या जोरावर मिळवले यशकु. निशिगंधा ओगलेची मंत्रालयात लिपिक पदावर निवड

परळीसारख्या शहरातून अत्यंत सामान्य परिस्थितीत शिक्षण घेत पुढे आलेल्या कु. निशिगंधा सिधू ओगले हिने आपल्या जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर म

बिंदुसरा नदीपात्र, ओपन स्पेस व व्यापारी संकुल अतिक्रमणप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनेगोरगरिबांवर कारवाई अन् भू-माफियांना अभय का?- डॉ. गणेश ढवळे
जनगणना 2026 मध्ये प्रत्येकाने सहभाग नोंदवावा; ही सामाजिक जबाबदारी – शेख युनूस
काळेगाव हायस्कूलचा दहावीचा निकाल 100 टक्के7 विद्यार्थिनींची 90 टक्क्यांहून अधिक गुणांची कमाई

परळीसारख्या शहरातून अत्यंत सामान्य परिस्थितीत शिक्षण घेत पुढे आलेल्या कु. निशिगंधा सिधू ओगले हिने आपल्या जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर महसूल विभागातील लिपिक पदावर निवड मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.तीचे शिक्षण यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात नवी मुंबई वाशी येथे झाले आहे.उद्यापासून ती मंत्रालय, मुंबई येथे सेवेत रुजू होणार आहे.निशिगंधाचे वडील सिद्धू उर्फ सिद्धार्थ ओगले हे मुंबईसारख्या मोठ्या शहरात गॅस टाकी सप्लाय करण्याचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. कुटुंबात आई रंजना सिधू ओगले,भाऊ निशिकांत सिधू ओगले आणि सगळ्यात छोटी बहीण निशिता सिधू ओगले असा परिवार आहे. कुटुंबाची परिस्थिती सर्वसाधारण असतानाही मुलीच्या शिक्षणासाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला. आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवत निशिगंधानेही शिक्षणात सातत्य ठेवून हे यश प्राप्त केले. फक्त शिक्षण आणि मेहनतीच्या जोरावर यश मिळवता येते, हे निशिगंधाने सिद्ध करून दाखवले आहे. तिच्या या यशामुळे ओगले परिवारासह परळी शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. निशिगंधाच्या यशाबद्दल सर्व स्तरातून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, पुढील वाटचालीसाठी तिला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या जात आहेत.

COMMENTS