संयोजक धर्मभूषण ड. दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून गेल्या तब्बल 75 महिन्यांपासून सुरू असलेल्या कायापालट या अनोख्या मानवतावादी उपक्रमातून आतापर्यं

संयोजक धर्मभूषण ड. दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून गेल्या तब्बल 75 महिन्यांपासून सुरू असलेल्या कायापालट या अनोख्या मानवतावादी उपक्रमातून आतापर्यंत 3700 पेक्षा अधिक बेसहारा, निराधार आणि मानसिकदृष्ट्या खचलेल्या व्यक्तींचा कायापालट करण्यात आला आहे. अनेकांना नवजीवन मिळाले असून काहींना रोजगाराची संधीही उपलब्ध करून देण्यात आली आहे. उपक्रमाच्या अमृत महोत्सवी पर्वानिमित्त विविध मान्यवरांनी उपस्थित राहून या सेवाभावी कार्याचे कौतुक केले.
सोमवारी नांदेड शहरातील गोवर्धन घाट परिसरात या उपक्रमाचे भावनिक चित्र पाहायला मिळाले. विस्कटलेले केस, वाढलेली दाढी, अंगावरील मळकट कपडे आणि चेहर्यावर निराशेची छाया घेऊन आलेल्या बेसहारा व्यक्तींना काही तासांतच स्वच्छ, नीटनेटके आणि आत्मविश्वासाने उजळलेले रूप मिळाले. कायापालट उपक्रमामुळे त्यांच्या चेहर्यावर पुन्हा हास्य फुलले. या उपक्रमाला माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, खा.डॉ. अजित गोपछडे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष संजय कोडगे, ड. चैतन्य देशमुख, माजी मंत्री डी. पी. सावंत, महानगराध्यक्ष अमर राजूरकर, जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे, ड. किशोर देशमुख, महापौर कविता मुळे, उपमहापौर दीपकसिंह रावत, स्थायी सभापती विरेंद्रसिंह गाडीवाले, सभागृह नेते ड. महेश कनकदंडे, विजय येवणकर, शीतल खांडील, विजय गंभीरे, सुषमा थोरात तसेच लायन्स उपप्रांतपाल योगेश जायस्वाल यांचे मार्गदर्शन लाभत आहे. भाजपा नांदेड महानगर, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल आणि अमरनाथ यात्री संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम दरमहा राबविण्यात येतो. उपक्रमात स्वयंसेवक राजू अण्णा यांनी बेसहारांची कटिंग व दाढी केली, तर महेंद्र शिंदे यांनी त्यांना स्नान घातले. स्वच्छ पाण्याची व्यवस्था सुरेश लोट यांनी केली. ड. दिलीप ठाकूर यांच्या तर्फे नवीन कपडे, चहा-फराळ तसेच प्रत्येकाला 100 रुपयांची मदत देण्यात आली. हैदराबाद येथील सरोज व पुष्पराज जायस्वाल, नागपूरचे ड. अभय अवधीया आणि प्रवीण अवधीया यांनी उपक्रमाला सदिच्छा भेट देत ड.ठाकूर यांच्या कार्याचे कौतुक केले. उपक्रमानंतर परिसराची स्वच्छताही करण्यात आली. प्रभुदास वाडेकर, सुरेश शर्मा, अरुण काबरा आणि शिवा लोट यांनी उपक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. कायापालट हा केवळ उपक्रम नसून माणुसकीचा जिवंत आरसा आहे. येथे फक्त चेहर्याचा नाही, तर आयुष्याचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला जातो.

COMMENTS