Homeताज्या बातम्याबीड

योगेश्वरीच्या महिला आत्मभान प्रशिक्षण शिबीराचा समारोप

योगेश्वरी क्रिडा प्रबोधिनी व श्रीमती कमल खुरसाळे न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या महिला आत्मभान शिबीराच्या समारोप कार्यक्रम

बी.फार्मसी महाविद्यालयात वार्षिक सांस्कृतिक महोत्सवाचा जल्लोषात शुभारंभराजकिशोर मोदी यांच्या हस्ते उद्घाटन ; जीपॅट पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार
मोदी सरकारच्या प्रस्तावित ऊस नियंत्रण  आदेशाला शेतकरी संघटनेचा विरोध
पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाददिनदयाळ बँकेचे सीईओ महेश शेळके सायकलवरून पोहोचले बँकेत



योगेश्वरी क्रिडा प्रबोधिनी व श्रीमती कमल खुरसाळे न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या महिला आत्मभान शिबीराच्या समारोप कार्यक्रम नुकताच संपन्न झाला अध्यक्षस्थानी योगेश्वरी शिक्षण संस्थेचे सचिव कमलाकर चौसाळकर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून अप्पर जिल्हाधिकारी अश्विनी सोनवणे होत्या व्यासपीठावर उपाध्यक्ष जी.बी.व्यास,डॉ.जे.बी. मोटेगांवकर,ऍड.के.जे. विर्धे,प्राचार्य डॉ.पी.एस.देशमुख,विद्यालय विभाग प्रमुख योगेश्वरी क्रिडा प्रबोधिनीचे पदाधिकारी,सदस्य उपस्थित होते.
 यावेळी बोलताना अश्विनी सोनवणे म्हणाल्या की,महिला आत्मभान प्रशिक्षण शिबिर उपयुक्त असून मुलींमध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी त्याचप्रमाणे त्यांना अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद मिळावी,स्वसंरक्षण करता यावे यासाठी शिबीरे गरजेचे आहेत. बदलत्या जीवन शैलीमुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ न देता ती उर्जा निर्माण करून समाजाच्या उपयोगी पडण्यासाठी विद्यार्थिनींनी पुढाकार घ्यावा असेही त्या म्हणाल्या.  शिबिराबाबत आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोपात चौसाळकर म्हणाले की,योगेश्वरी शिक्षण संस्था घेत असलेले महिला आत्मभान प्रशिक्षण शिबीर मुलींसाठी महत्वाचे असून यामुळे शारिरीक क्षमता वृद्धींगत होते.शिबीरात झालेल्या विविध क्रिडा प्रकारांचा विद्यार्थिंनीनी सराव वर्षभर करावा म्हणजे त्याचा उपयोग भावी काळात होईल. शिबीरार्थी मुलींनी योगासने,काठी-लाठी, तलवारबाजी,कराटे इत्यादी वेगवेगळे प्रात्यक्षिके करून दाखवले. उपस्थित पाहुण्यांचे तसेच शिबीरातील विविध प्रशिक्षक,योगशिक्षक यांचे स्वागत संस्थेच्या वतीने करण्यात आले.  प्रास्ताविक प्राचार्य डॉ.पी.एस.देशमुख यांनी केले.तर डॉ.रशिदा शेख यांनी संचालन केले.यावेळी संस्थेचे पदाधिकारी, संचालक,विविध विभागाचे प्रमुख,शिक्षक, प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी पालक उपस्थित होते.

COMMENTS