Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निदा खानला 11 मे पर्यंत सुनावली पोलिस कोठडीछत्रपती संभाजीनगरमधून अटक ; तपासाला येणार वेग

छ.संभाजीनगर : नाशिकच्या टीसीएस कंपनीतील कथित धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान हिला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. गेल्

अशोक खरातला सहा दिवसांची ईडी कोठडीपतसंस्थेच्या बोगस खात्यांतून कोट्यवधींची उलाढाल
सुनेच्या हल्ल्यात वृद्ध सासूचा मृत्यू
बायकोने घेतला नवऱ्याचा मोबाईल… रागाच्या भरात नवऱ्याने चिरला बायकोचा गळा
Nida Khan Arrested | Nashik TCS Case: ४० दिवसांनी निदा खानला संभाजीनगरमध्ये  अटक


छ.संभाजीनगर : नाशिकच्या टीसीएस कंपनीतील कथित धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान हिला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या सुमारे 25 दिवसांपासून ती फरार होती. पोलिसांनी तिला छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात घेतले असून, नाशिक कोर्टात हजर केले असता न्यायालयाने तिची 11 मेपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निदा खानचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली होती. तांत्रिक माहिती, गुप्त तपास आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने संयुक्त कारवाई करत तिला पकडण्यात यश आले. तपासादरम्यान ती छत्रपती संभाजीनगरातील नारेगाव परिसरातील एका सदनिकेत राहत असल्याचे उघड झाले आहे. त्या ठिकाणी तिच्यासोबत कुटुंबीयही वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू असून, पुढील चौकशीत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. न्यायालयाकडून पोलिस कोठडी मिळाल्यानंतर तपासाला अधिक वेग येईल, असे अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. या प्रकरणात कंपनीतील काही अधिकार्‍यांसह इतर संशयित आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. निदा खानवर गुन्हा दाखल झाल्यानंतर ती फरार झाली होती. तिने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. आपण गर्भवती असल्याचा दावा करत तिला दिलासा द्यावा, अशी मागणी बचाव पक्षाने न्यायालयात केली होती. मात्र न्यायालयाने तिचा अर्ज फेटाळून लावला. फरार असताना ती सतत ठिकाण बदलत असल्याने पोलिसांना तिचा माग काढण्यात अडचणी येत होत्या. तिच्या संपर्कातील काही व्यक्ती आणि नातेवाईकांचीही चौकशी करण्यात आली होती. अखेर ती छत्रपती संभाजीनगरमध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करून तिला ताब्यात घेतले.
एमआयएम नगरसेवकाच्या मदतीचा संशय
या प्रकरणात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील एका स्थानिक नगरसेवकाने निदा खानला आश्रय दिल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या संदर्भात संबंधित नगरसेवकाला नोटीस बजावण्यात आली असून त्यांचा भ्रमणध्वनीही जप्त करण्यात आला आहे. तपासात असेही समोर आले आहे की, निदा खान काही दिवसांपासून नारेगाव परिसरातील नव्याने खरेदी करण्यात आलेल्या घरात राहत होती. या ठिकाणी तिला लपवून ठेवण्यात आल्याचा संशय असून, तिला मदत करणार्‍या व्यक्तींची सखोल चौकशी सुरू आहे.
इम्तियाज जलीलकडून निदा खानची पाठराखण
एमआयएमचे नेते तथा माजी खासदार इम्तियाज जलील यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणातील संशयित आरोपी निदा खान हिची पाठराखण केली. प्रस्तुत प्रकरणातील मुलीने आम्हाला संपूर्ण वस्तुस्थिती सांगितली. मी स्वतः एफआयआर वाचला. त्यात विशेष असे काहीच नाही. मी यापूर्वीच सदर तरुणीला तुझ्याकडून काही चूक झाली असेल, तर मी तुझ्यासोबत उभा राहणार नाही असे सांगितले आहे. पण या प्रकरणात तिने जे सांगितले त्यानुसार सर्वकाही झाले असेल, तर मी तिच्यासोबत प्रामाणिकपणे पूर्ण ताकदीने उभा राहीन, असे ते म्हणालेत.

COMMENTS