Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नांदेड जिल्हा मध्यवर्ती कारागृहात आयुष्यमान आरोग्य शिबिर; 90 कैद्यांची तपासणी

नांदेड : नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने पंतप्रधान टीबी मुक्त भारत अभियानांतर्गत राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाच्या माध्यमातून नां

चारधाम यात्रेत दोन भाविकांचा मृत्यू; मृतांमध्ये महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील भाविकांचा समावेश
क्रेडाईच्या वतीने कामगार कल्याण सप्ताहाचे आयोजन;श्रमिक सन्मान – आपले योगदान, आमचा अभिमान अंतर्गत विविध उपक्रम राबविणार-अंबाजोगाई क्रेडाईचे अध्यक्ष संजय सुराणा
अस्थिविकार तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद 

नांदेड : नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने पंतप्रधान टीबी मुक्त भारत अभियानांतर्गत राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाच्या माध्यमातून नांदेड जिल्हा मध्यवर्ती कारागृह येथे आयुष्यमान 100 डे टीबी कॅम्पेन दुसर्‍या टप्प्यात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.
महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकेवार, उपायुक्त अजितपालसिंग संधु, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत रिठे आणि शहर क्षयरोग अधिकारी डॉ. मोहम्मद बदीयोद्दिन यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले. या प्रसंगी वरिष्ठ तुरुंग अधिकारी विजय मेश्राम, डॉ. रितेश बिशेन, फार्मासिस्ट रंजित पवार, पोलीस कॉन्स्टेबल डोके, क्षयरोग सुपरवायझर राम सोळंके, कार्यक्रम समन्वयक बालाजी साखरे, पांडुरंग दुमाणे, रविंद्रकुमार कावडे, विश्वास साबणे, एक्स-रे तंत्रज्ञ किशोर राठोड आणि साथी संस्थेचे राजू गायकवाड उपस्थित होते. 6 ते 8 मे या कालावधीत आयोजित तीन दिवसीय शिबिरात कैद्यांची एक्स-रे मशीनद्वारे तपासणी करण्यात येत असून, पहिल्या दिवशी 90 कैद्यांची आरोग्य तपासणी करून त्यांचे एक्स-रे काढण्यात आले. शिबिर यशस्वी करण्यासाठी क्षयरोग विभाग, कारागृह प्रशासन आणि आरोग्य कर्मचार्‍यांनी विशेष प्रयत्न केले.

COMMENTS