Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘स्थानिक’च्या निवडणुकांत मनसेचा विजयाचा निर्धार; सुपा येथे पदाधिकारी-कार्यकर्त्यांची बैठक; संघटन विस्तारवर भर

सुपा : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था तसेच सहकार क्षेत्रातील निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी ठोस कामगिरी करत विजयाचा झेंडा फडकवावा, असा निर्धार मनसेचे अहिल्यानगर जिल्हा संपर्कप्रमुख नयन कदम यांनी व्यक्त केला. पारनेर तालुक्यातील मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक सुपा येथे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांच्या उपस्थितीत पार पडली. बैठकीत संघटनात्मक बांधणी, आगामी निवडणुकांची रणनीती आणि सहकार क्षेत्रातील संधी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. पक्षाची आगामी भूमिका स्पष्ट करताना नयन कदम यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मनसेची ताकद वाढवणे, सहकार क्षेत्रात कार्यकर्त्यांना प्राधान्य देणे, तरुण व नव्या नेतृत्वाला संधी उपलब्ध करून देणे तसेच गावपातळीवर संघटन विस्तार करून जनसंपर्क वाढवण्याच्या सूचना तालुकाध्यक्ष अविनाश पवार यांना दिल्या. यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष अविनाश पवार म्हणाले, स्थानिक प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी भाग पाडले जाईल. पारनेर तालुक्यात सक्षम विरोधी पक्ष म्हणून मनसेची भूमिका राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बैठकीदरम्यान तालुका उपाध्यक्ष सतीश म्हस्के यांची पारनेर तालुका खादी ग्रामोद्योग संघाच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल तसेच तालुका सचिव नारायण नरवडे यांची कडूस ग्रामपंचायत सदस्यपदी निवड झाल्याबद्दल नयन कदम यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. बैठकीस जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र गाडगे, तालुकाध्यक्ष अविनाश पवार, तालुका सचिव नारायण नरवडे, तालुका उपाध्यक्ष विरेंद्र थोरात, अक्षय सूर्यवंशी, बाबू कोठावळे, सूरज गोरे, निकम गजरे, सतीश म्हस्के यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

गोदा ते नर्मदा अभियानात नागपूरचा सहभाग; मंत्री बावनकुळे यांच्या हस्ते पेंच नदीतील पवित्र जल कलश पूजन
भोसा खिंड प्रकल्पाला हक्काचे पाणी द्यावे; सभापती तापकीर ; कर्जतसाठी कुकडी, सीना व घोड कालव्यांचे आवर्तन सोडण्याची मागणी 
पोलीस निरीक्षक मुख़्तारखान पठाण यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान

सुपा : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था तसेच सहकार क्षेत्रातील निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी ठोस कामगिरी करत विजयाचा झेंडा फडकवावा, असा निर्धार मनसेचे अहिल्यानगर जिल्हा संपर्कप्रमुख नयन कदम यांनी व्यक्त केला. पारनेर तालुक्यातील मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक सुपा येथे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांच्या उपस्थितीत पार पडली.

बैठकीत संघटनात्मक बांधणी, आगामी निवडणुकांची रणनीती आणि सहकार क्षेत्रातील संधी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. पक्षाची आगामी भूमिका स्पष्ट करताना नयन कदम यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मनसेची ताकद वाढवणे, सहकार क्षेत्रात कार्यकर्त्यांना प्राधान्य देणे, तरुण व नव्या नेतृत्वाला संधी उपलब्ध करून देणे तसेच गावपातळीवर संघटन विस्तार करून जनसंपर्क वाढवण्याच्या सूचना तालुकाध्यक्ष अविनाश पवार यांना दिल्या.

यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष अविनाश पवार म्हणाले, स्थानिक प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी भाग पाडले जाईल. पारनेर तालुक्यात सक्षम विरोधी पक्ष म्हणून मनसेची भूमिका राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बैठकीदरम्यान तालुका उपाध्यक्ष सतीश म्हस्के यांची पारनेर तालुका खादी ग्रामोद्योग संघाच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल तसेच तालुका सचिव नारायण नरवडे यांची कडूस ग्रामपंचायत सदस्यपदी निवड झाल्याबद्दल नयन कदम यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

बैठकीस जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र गाडगे, तालुकाध्यक्ष अविनाश पवार, तालुका सचिव नारायण नरवडे, तालुका उपाध्यक्ष विरेंद्र थोरात, अक्षय सूर्यवंशी, बाबू कोठावळे, सूरज गोरे, निकम गजरे, सतीश म्हस्के यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS