नवी दिल्ली : सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी बुधवारी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा र

नवी दिल्ली : सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी बुधवारी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत विजय मिळवल्यानंतर नियमांनुसार एकाचवेळी दोन सभागृहांचे सदस्यत्व राखता येत नसल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला.
दिल्लीतील दौर्यादरम्यान त्यांनी उपराष्ट्रपती तसेच राज्यसभेचे पदसिद्ध सभापती सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन राजीनामा सादर केला. त्यांच्या या पावलामुळे राज्यसभेतील एक जागा रिक्त झाली असून त्या जागेवर कोणाची निवड होणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. सुनेत्रा पवार यांची यापूर्वी बिनविरोध राज्यसभेवर निवड झाली होती आणि त्या केंद्रातील राजकारणात सक्रिय होत्या. मात्र, राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीत त्यांनी विधानसभेत प्रवेश करत पुन्हा राज्याच्या राजकारणात सक्रिय भूमिका स्वीकारली आहे. सुनेत्रा पवार यांच्या या निर्णयामुळे आणि दिल्ली दौर्यामुळे राज्यातील राजकारणात पुढील घडामोडींविषयी उत्सुकता वाढली असून त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS