Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिर्डी पोलिसांच्या ताब्यातील भोंदू खरातला ५ दिवसांची पोलीस कोठडी

राहता : फसवणूक प्रकरणी शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या भोंदू अशोक खरातला राहता न्यायालयाने  ९ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी ७ द

भामट्या अशोक खरातच्या अत्यंत विश्वासू सहकारी जितेंद्र शेळके यांचा संशयास्पद मृत्यू; SIT मागणीने खळबळ
भोंदू बाबा खरात हा फडणवीस सरकारचाच माणूस!
भोंदूबाबा अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचा समृद्धीवर भीषण अपघातात मृत्यू!
Transactions worth Rs 17 crore in nationalized banks in the name of  fraudster Kharat and his wife, Shirdi police sought income tax returns of  Ashok Kharat for five years

राहता : फसवणूक प्रकरणी शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या भोंदू अशोक खरातला राहता न्यायालयाने  ९ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी ७ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती यावेळी न्यायालयाने खरात याला ५ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे

 राज्यभरात भोंदू कारवाया व आर्थिक गैरव्यवहार माध्यमातून खळबळ उडून देणाऱ्या अशोक खरात याला शिर्डी पोलिसांनी फसवणूक प्रकरणी नाशिक मधून शिर्डी येथे आणले आहे. शिर्डी येथील रावसाहेब गोंदकर जमीन खरेदी गैरव्यवहार व अवैध सावकारीचा गुन्हा दाखल झालेल्या अशोक खरात, पत्नी कल्पना खरात, अरविंद बावके, सोनवणे  पाच आरोपींवर शिर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून भोंदू अशोक खराब याच्यावर महिलांच्या लैंगिक शोषणाचे देखील गुन्हे दाखल झाले आहे .एसआयटी कडून तपास सुरू असून सात ते आठ गुन्ह्यांमध्ये त्यास पोलीस कोठडी मिळाली आहे..आरोपी भोंदू अशोक खरात याला  राहता न्यायालयात हजर करण्यात आले पुढील तपास करण्यासाठी सात दिवसांची पोलीस कोठडी देण्याची विनंती पोलिसांकडून न्यायालयाकडे केली गेली.

 अशोक खरात आणि त्याच्या पत्नीवर शिर्डी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक जमिनींचे बेकायदेशीर व्यवहार आणि अनाधिकृत सावकारी अशा आरोपांचा समावेश आहे. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून रावसाहेब गोंडकर नावाच्या शेतकऱ्याला विविध प्रलोभने दाखवून खरात दांपत्याने मोठा आर्थिक गंडा घातल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपी  भोंदू अशोक खरात शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी राहता येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली. भोंदू अशोक खरातला मिळालेल्या पाच दिवसाच्या पोलीस कोठडीमुळे त्याची सखोल चौकशी होऊन चौकशी दरम्यान अनेक धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या कारवाईमुळे भोंदूगिरीच्या आडून सुरू असलेल्या आर्थिक फसवणुकीवर लगाम बसणार असून पुढील काही दिवसात या प्रकरणात आणखी खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता

 भोंदू अशोक खरातला मिळालेल्या पाच दिवसाच्या पोलीस कोठडीमुळे त्याची सखोल चौकशी होऊन चौकशी दरम्यान अनेक धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या कारवाईमुळे भोंदूगिरीच्या आडून सुरू असलेल्या आर्थिक फसवणुकीवर लगाम बसणार असून पुढील काही दिवसात या प्रकरणात आणखी खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

COMMENTS