Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आमदारकीचा सातबारा माझा;पण पोटहिश्यात कार्यकर्ते : विवेक कोल्हे ; विजयी मिरवणुकीने कोपरगाव दुमदुमले; विकासाचे आश्वासन

कोपरगाव : युवा नेते विवेक कोल्हे यांच्या विजयी मिरवणुकीने शनिवारी कोपरगाव शहर दुमदुमून गेले. “धन्यवाद देवा भाऊ धन्यवाद” या घोषणांनी वातावरण भारावून गेले होते. सायंकाळी सहा वाजता सुरू झालेली ही मिरवणूक रात्री अकरा वाजेपर्यंत रंगली. माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचे आशीर्वाद, तळागाळातील कार्यकर्त्यांची साथ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास यामुळेच हे यश मिळाल्याची भावना विवेक कोल्हे यांनी व्यक्त केली. ही नवी सुरुवात असून पक्ष संघटना बळकट करत विकासाची गती वाढविणार असल्याचा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव ते मुंबईहून समृद्धी मार्गे कोपरगावात दाखल झाले. साईबाबा कॉर्नर येथे त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर शहरातून भव्य विजयी मिरवणूक काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे या मिरवणुकीचा समारोप झाला. यावेळी बोलताना विवेक कोल्हे म्हणाले, की संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील राजकीय वाटचाल सुरू आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडू, तसेच कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. “आमदारकी माझ्या नावावर असली तरी ती तुमच्याही सहभागाची आहे,” अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांचा गौरव केला. मिरवणुकीपूर्वी कोल्हे कारखाना परिसरातील श्री हनुमान मंदिर व श्री महादेव मंदिर येथे दर्शन घेण्यात आले. यावेळी बिपिनकोल्हे,  रेणुका कोल्हे, संचालक मंडळ, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रसंगी संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे विश्वस्त सुमित कोल्हे, ईशान कोल्हे, नगराध्यक्ष पराग संधान आदींनी शहरवासीयांच्या वतीने विवेक कोल्हे यांचा भव्य सत्कार केला. या मिरवणुकीत भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, विविध संस्थांचे प्रतिनिधी, नगरसेवक, कार्यकर्ते तसेच महिला-पुरुष नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

३० वर्षांपासून कीर्तन सेवेची अखंड साधना; दोन मित्रांचा भक्ती, शिस्त आणि समर्पणाचा आदर्श
प्रज्ञाशोध परीक्षेत समर व सक्षम यशस्वी
गौतम पब्लिक स्कुलमध्ये प्रवेश प्रक्रिया संपन्न

कोपरगाव : युवा नेते विवेक कोल्हे यांच्या विजयी मिरवणुकीने शनिवारी कोपरगाव शहर दुमदुमून गेले. “धन्यवाद देवा भाऊ धन्यवाद” या घोषणांनी वातावरण भारावून गेले होते. सायंकाळी सहा वाजता सुरू झालेली ही मिरवणूक रात्री अकरा वाजेपर्यंत रंगली.

माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचे आशीर्वाद, तळागाळातील कार्यकर्त्यांची साथ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास यामुळेच हे यश मिळाल्याची भावना विवेक कोल्हे यांनी व्यक्त केली. ही नवी सुरुवात असून पक्ष संघटना बळकट करत विकासाची गती वाढविणार असल्याचा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव ते मुंबईहून समृद्धी मार्गे कोपरगावात दाखल झाले. साईबाबा कॉर्नर येथे त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर शहरातून भव्य विजयी मिरवणूक काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे या मिरवणुकीचा समारोप झाला.

यावेळी बोलताना विवेक कोल्हे म्हणाले, की संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील राजकीय वाटचाल सुरू आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडू, तसेच कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. “आमदारकी माझ्या नावावर असली तरी ती तुमच्याही सहभागाची आहे,” अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांचा गौरव केला.

मिरवणुकीपूर्वी कोल्हे कारखाना परिसरातील श्री हनुमान मंदिर व श्री महादेव मंदिर येथे दर्शन घेण्यात आले. यावेळी बिपिनकोल्हे,  रेणुका कोल्हे, संचालक मंडळ, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रसंगी संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे विश्वस्त सुमित कोल्हे, ईशान कोल्हे, नगराध्यक्ष पराग संधान आदींनी शहरवासीयांच्या वतीने विवेक कोल्हे यांचा भव्य सत्कार केला. या मिरवणुकीत भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, विविध संस्थांचे प्रतिनिधी, नगरसेवक, कार्यकर्ते तसेच महिला-पुरुष नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

COMMENTS