Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ऋतुजा अशोकराव गायकवाड हिचा समस्त माळी पंच मंडळी राहाता व ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार; यूपीएससी स्पर्धा परीक्षेत देशात १०६ वा क्रमांकावर

राहाता : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) स्पर्धा परीक्षेत देशात १०६ वा क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या ऋतुजा अशोकराव गायकवाड हिचा समस्त माळी पंच मंडळी राहाता व ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. येथील संत शिरोमणी सावता महाराज मंदिरात हा सोहळा उत्साहात पार पडला. सत्काराला उत्तर देताना ऋतुजा गायकवाड हिने आपल्या यशामागे आई-वडील व भावाचा मोठा वाटा असल्याचे सांगितले. “कुटुंबाने नेहमी पाठबळ दिले. ‘तू अभ्यास करत जा, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत,’ या शब्दांनी मला बळ मिळाले. दिल्ली येथे तीन वर्षे सातत्याने अभ्यास करून मी हे यश मिळवले. माझे आणि कुटुंबाचे स्वप्न पूर्ण झाले,” असे ती म्हणाली. तसेच भविष्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आपण सदैव तत्पर राहू, अशी ग्वाहीही तिने दिली. “माझे स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद आयुष्यातील मोठा टप्पा आहे,” असेही तिने नमूद केले. या सोहळ्यास माळी पंच मंडळीचे अध्यक्ष मच्छिंद्र बनकर, उपाध्यक्ष संदीप गाडेकर, विश्वस्त मच्छिंद्र निधान, भिवसेन गाडेकर, विशाल गाडेकर, प्रशांत टिळेकर, आप्पा मेहेत्रे, प्रदीप बनकर, राधाकिसन भुजबळ, सौ. जेजुरकर मॅडम, अण्णासाहेब गाडेकर, देवराम गाडेकर, अशोक गाडेकर, अमोल गाडेकर, नानासाहेब गाडेकर, नितीन गाडेकर, नगरसेवक शिवाजी बनकर, संतोष जाधव, अनिल घाडगे, सुनील गायकवाड, आदिनाथ बनकर, शरद गाडेकर, शिवनाथ बनकर, बाबुराव गाडेकर, सचिन बनकर यांच्यासह गायकवाड व झोडगे परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

कोपरगावमध्ये महाराष्ट्र दिनी वीरपत्नीच्या हस्ते ध्वजारोहण 
पितृशोकातून परीक्षेत सामोरे जाणारी प्रिया कॉलेजमध्ये दुसरी
समर कॅम्पमुळे मुलं तणावमुक्त होतात : अध्यक्ष अनंत ढोले ढोले

राहाता : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) स्पर्धा परीक्षेत देशात १०६ वा क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या ऋतुजा अशोकराव गायकवाड हिचा समस्त माळी पंच मंडळी राहाता व ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. येथील संत शिरोमणी सावता महाराज मंदिरात हा सोहळा उत्साहात पार पडला.

सत्काराला उत्तर देताना ऋतुजा गायकवाड हिने आपल्या यशामागे आई-वडील व भावाचा मोठा वाटा असल्याचे सांगितले. “कुटुंबाने नेहमी पाठबळ दिले. ‘तू अभ्यास करत जा, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत,’ या शब्दांनी मला बळ मिळाले. दिल्ली येथे तीन वर्षे सातत्याने अभ्यास करून मी हे यश मिळवले. माझे आणि कुटुंबाचे स्वप्न पूर्ण झाले,” असे ती म्हणाली.

तसेच भविष्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आपण सदैव तत्पर राहू, अशी ग्वाहीही तिने दिली. “माझे स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद आयुष्यातील मोठा टप्पा आहे,” असेही तिने नमूद केले.

या सोहळ्यास माळी पंच मंडळीचे अध्यक्ष मच्छिंद्र बनकर, उपाध्यक्ष संदीप गाडेकर, विश्वस्त मच्छिंद्र निधान, भिवसेन गाडेकर, विशाल गाडेकर, प्रशांत टिळेकर, आप्पा मेहेत्रे, प्रदीप बनकर, राधाकिसन भुजबळ, सौ. जेजुरकर मॅडम, अण्णासाहेब गाडेकर, देवराम गाडेकर, अशोक गाडेकर, अमोल गाडेकर, नानासाहेब गाडेकर, नितीन गाडेकर, नगरसेवक शिवाजी बनकर, संतोष जाधव, अनिल घाडगे, सुनील गायकवाड, आदिनाथ बनकर, शरद गाडेकर, शिवनाथ बनकर, बाबुराव गाडेकर, सचिन बनकर यांच्यासह गायकवाड व झोडगे परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

COMMENTS